शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी भाजपाचा सर्वात मोठा भ्रष्टाचार - शिवाजीराव मोघे

By admin | Updated: January 2, 2017 20:23 IST

नोटबंदीचे ५० दिवस झाल्यानंतरही सरकार जनतेसाठी काही खास करू शकली नाही. या नोटबंदीमुळे सर्वसमान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 2 - नोटबंदीचे ५० दिवस झाल्यानंतरही सरकार जनतेसाठी काही खास करू शकली नाही. या नोटबंदीमुळे सर्वसमान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. नोटबंदी म्हणजे भाजपाचा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी करून नोटबंदीच्या निषेधार्थ जिल्ह्यात ६ व ८ जानेवारी रोजी मोर्चा व घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.स्थानिक काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात २ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहूल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, विजय खडसे, जि.प.अध्यक्षा अलका खंडारे, जयश्री शेळकेख बलदेवराव चोपडे, अंजली टापरे, मिनल आंबेकर, महेंद्र बोर्डे, मुख्त्यारसिंग राजपूत, अ‍ॅड.सुनिल देशमुख आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाबाबत प्राथमिक माहिती देताना मोघे म्हणाले की, सरकारच्या नोटबंदीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेससमितीतर्फे तालुकास्तरावरील प्रभारींची निवड करण्यात आली आहे. सदर प्रभारींच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन दोन गटात करण्यात येणार असून प्रथम तालुकास्तरावर ६ जानेवारी रोजी तर दुसऱ्यांदा ८ जानेवारी रोजी राष्ट्रीयकृत बँक शाखेसमोर करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदीमुळे बँकेत पैसेनसल्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागले. याचा निषेधार्थ बँकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. मोदी ऐतिहासिक कलाकारशिवाजीराव मोघे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करीत पंतप्रधान मोदी ऐतिहासिक कलाकार आहेत. ते ज्या प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना संमोहित करतात, नागरिक त्यांच्या इशाऱ्यावर चालतात. यावरून ते ऐतिहासीक कलाकार असल्याचे समोर आले आहे. नोटबंदीच्या माध्यमातून करोडो रूपये बदलण्यात आले आहेत, हे आता समोर येत आहे. मात्र मागिल ५० दिवसात सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे जनतेने या त्रासाचा निषेधार्थ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.