शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या आशिष शेलारांकडून कोट्यवधींंचा घोटाळा - प्रीती मेनन

By admin | Updated: June 18, 2017 01:02 IST

आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. तूरडाळीपासून बचत गट आणि मनी लाँड्रिंगसह ४५ घोटाळ्यांत शेलार यांचा सहभाग आहे. मात्र, त्याबाबत तक्रार देऊनही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि सत्ताधारी पक्ष त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. तथापि, शेलार यांनी मेनन यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जाणीवपूर्वक व वैयक्तिक द्वेषातून आपल्याविरुद्ध आरोप करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रीती मेनन म्हणाल्या, ‘शेलार हे संचालक असलेल्या सर्वेश्वर आणि रिद्धी या कंपन्या कसलाही व्यवसाय करत नाहीत, तरीही इतका पैसा कमावत आहे. याबाबत ‘आप’च्या वतीने गेल्यावर्षी जुलैमध्ये एसीबी, ईडीसह सीबीआयकडे तक्रार नोंदविली आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकाही तपास यंत्रणेने त्याची दखल घेतलेली नाही. ‘राष्ट्रवादी’चे नेते छगन भुजबळ यांची चौकशी करण्यासाठी जी तत्परता दाखवली, काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या घरावर छापे टाकले जातात. या तपासांमध्ये जितकी तत्परता दाखवली जाते, तितकी शेलारांच्या तक्रारीबाबत का दाखविली जात नाही, असा सवाल मेनन यांनी केला.सत्ताधारी पक्षाकडून स्वपक्षीय नेत्याला वाचविण्यात येत असून, मुंबई दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व आरोप बिनबुडाचे : शेलारआशिष शेलार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘आप’ने केलेले आरोप जुनेच असून, त्याचा वेळोवेळी मी सविस्तर कागदपत्रांसह खुलासा केलेला आहे. सर्वेश्वर आणि रिद्धी या दोन कंपन्यांशी आता माझा कोणताही संबंध नाही. माझी कुणाशीही भागीदारी नसून, कोणत्याही कंपनीच्या संचालक मंडळावर नाही.