शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार

By admin | Updated: December 22, 2016 23:30 IST

नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.

आॅनलाइन लोकमत,

अहमदनगर, दि. २२- नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. आता जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची आहे. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी वर्चस्व संपले आहे. यापुढे अहमदनगर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा गुरूवारी शेंडी येथे झाला. त्यात त्यांनी ही घोषणा केली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, दिलीप भालसिंग, विलास शिंदे, शाम पिंपळे, हरिभाऊ कर्डिले, अक्षय कर्डीले, बन्सी कराळे, दत्तात्रय मगर, सुभाष झिने, दत्तात्रय सप्रे, बाजीराव गवारे, भानुदास सातपुते आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे म्हणाले बाजार समिती निवडणुकीत कर्डिले-पाचपुते यांना पाडण्यासाठी महाआघाडी स्थापन केली जाते. आता मलाही शह देण्यासाठी विरोधक महाआघाडीच्या तयारीत आहेत. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी संपलेली असून अखेरची घटका मोजत आहे. सेनेचे काहीही खरे नाही. जिल्ह्यात भाजपची ताकत वाढली असून नंबर एक पक्ष बनला आहे. कर्डिले, पाचपुते डावपेच खेळण्यात तरबेज असल्यामुळे मी नेहमी त्यांच्या बाजूला बसतो. या निवडणुकीत भाजपची सत्ता येणार यात तिळमात्र शंका नाही. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. कर्डिले म्हणाले, थोरात-विखे यांच्यात भांडण लागत नाही, तोपर्यंत आपली पोळी भाजणार नाही. म्हणूनच राहुरी नगरपालिकेत विखे यांच्याबरोबर युती केली होती. यामुळेच राहात्यात भाजपला यश मिळाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या पराभवालाही काँग्रेसच कारणीभूत आहे. विखे नेहमीच विरोधी पक्षाला मदत करण्याचे काम करतात. या डावपेचामुळेच राहात्याच भाजपला फायदा झाला. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किल्ल्या पलिकडे जात नाहीत. किल्ला सोडून हात घातला तर आपले अस्तित्व राहणार नाही, हे त्यांना माहीत आहे. पाचपुते म्हणाले ,कर्डिले यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी लक्ष घालावे लागणार आहे. जिल्हाध्यक्ष बेरड यांनी नगर तालुक्यात अविचाराची आघाडी तयार झाली असून ही संधी साधुंची टोळी आहे. नगर तालुक्याचे विभाजन झाले असले तरी कर्डिले यांच्या माध्यमातून तालुक्याला पालकत्व मिळाले आहे. अहमदनगर महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी भिडली.