शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डम्पर आंदोलनातून सेना-भाजपाने घेतली माघार

By admin | Updated: March 9, 2016 06:11 IST

कोकण आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांमुळे सेना-भाजपाच्या नेत्यांनी डम्पर आंदोलन मागे घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठप्प असलेला गौणखनिज व्यवसाय उद्यापासून सुरू होणार

सिंधुदुर्ग : कोकण आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांमुळे सेना-भाजपाच्या नेत्यांनी डम्पर आंदोलन मागे घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठप्प असलेला गौणखनिज व्यवसाय उद्यापासून सुरू होणार असल्याचे शिवसेना आमदार वैभव नाईक व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले; तर काँग्रेस प्रणीत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत आणि अशोक सावंत यांनी जाहीर केले. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू झालेले डम्पर आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे.गेल्या पाच दिवसांपासून डम्पर चालक-मालक संघटनेचे जिल्हा प्रशासनाच्या धोरणाविरोधात जिल्हा मुख्यालयात आंदोलन सुरू होते. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जोपर्यंत लेखी मागण्या मान्य केल्याचे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. दरम्यान, आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्यामुळे या सर्वपक्षीय आंदोलनाची दिशा काँग्रेस विरुद्ध शिवसेना-भाजपा अशी झाली होती. त्या दिवसापासून शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांच्या संपर्कात होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या निर्देशानुसार मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे सिंधुदुर्गात दाखल झाले. या वेळी भाजपा व सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत मागण्या मांडल्या. आयुक्तांबरोबच्या चर्चेनंतर आम्ही समाधानी असून, आंदोलन मागे घेत आहोत व उद्यापासून सर्व व्यावसायिक काम सुरू करतील, असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली असली तरी जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत डम्पर चालक-मालक संघटनेचे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी आग्रही भूमिका काँग्रेस प्रणीत संघटनांनी जाहीर केली. (प्रतिनिधी)> नीतेश राणेंवरील गुन्हे मागे घ्याआमदार नीतेश राणे हे आमचे प्रश्न मांडण्यासाठी आले होते. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही अपमानास्पद असून, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केल्याचे संदेश व अशोक सावंत यांनी सांगितले. कोकण विभागीय आयुक्त व कोकण परिक्षेत्रीय पोलीस महासंचालकांशी याबाबत चर्चा झाली असून, जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली होणारच, असेही राजन तेली म्हणाले.