शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा महाराष्ट्रात निवडून येणार - नितीन गडकरी

By admin | Updated: February 21, 2017 19:25 IST

निरंतर विकास हा भाजपाचा ध्यास आहे. ५० वर्षांच्या तुलनेत भाजपाने अडीच वर्षांतच विकास करून दाखविला आहे. विकास कामांमुळे भाजपा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात निवडून येईल

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21 : निरंतर विकास हा भाजपाचा ध्यास आहे. ५० वर्षांच्या तुलनेत भाजपाने अडीच वर्षांतच विकास करून दाखविला आहे. विकास कामांमुळे भाजपा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात निवडून येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गडकरी यांनी कुटुंबीयांसोबत महाल येथील मनपा टाऊन हॉल येथे सकाळी मतदान केले. मतदानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपुरात भाजपा १०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी जात, पंथ, धर्म सोडून मतदान करण्याचे आवाहन केले.

नवीन मतदारांची नोंदगडकरी म्हणाले, देशाच्या विकासासाठी मतदान करा. त्यामुळे देशात परिवर्तन येईल आणि लोकशाही मजबूत होईल. नागपुरात १.१० लाख नवीन मतदार जुळले आहेत. त्याआधारे प्रत्येक प्रभागात २.५० हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. युवा मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. नवीन मतदारांना शुभेच्छा असून त्यांनी विकासासाठी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

पराजय होईल तिथेही विकास करूनागपूर महापालिकेच्या निवडणुकीत गेल्यावेळी ५२ टक्के मतदान झाले होते. यावर्षी ७० टक्के होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूरसह महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून येतील. निवडणुकीत विजय वा पराभव होत असतो. पण जिथे निवडून येणार नाही, तिथेही विकास कामे करीत राहू. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वात निरंतर विकासाची कामे सुरू आहेत.

ही महाराष्ट्रासाठी जमेची बाजू आहे. केंद्र सरकारने विकास कामे करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सकाळीच भाजपा सर्वत्र निवडून येत असल्याचे सांगितले आहे. मतदारांचा कौल मान्य राहील, असे त्यांनी सांगितले.