शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने घेतला संघ स्वयंसेवकांचा आधार

By admin | Updated: February 12, 2017 04:36 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान पार पडणार आहे. आपल्या मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी आणण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर मुंबईत आहे.

- यदु जोशी,  मुंबई

आगामी महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान पार पडणार आहे. आपल्या मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी आणण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर मुंबईत आहे. त्याचवेळी कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क असलेली शिवसेना मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर नेण्याची क्षमता राखते ही भाजपासाठी मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा आधार घेतला जात आहे.शिवसेनेचे महापालिका निवडणुकीचे नियोजन साधारणत: वर्षभरापूर्वी सुरू होते. कट्टर शिवसैनिक, शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि युवा सेनेचे कार्यकर्ते घरोघरी संपर्काची योजना बनवतात. शिवसेनेच्या शाखांमधून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. कार्यकर्त्यांचा राबता असतो आणि अडीअडचणी घेऊन अनेक नागरिक या शाखांमध्ये येत असतात. अशा नेटवर्कचा अभाव ही भाजपाची डावी बाजू आहे. नागपुरात रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे कॅडर भाजपाच्या उमेदवारांना मदत करते. मुंबईत मुळात शिवसेनेच्या तुलनेने संघाचे कॅडर फारच कमी आहे. तरीही आहेत त्या लहान-मोठ्या स्वयंसेवकांची मदत घेण्याचा प्रयत्न भाजपाचे उमेदवार करीत आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांमधून लहान-मोठे नेते भाजपात आले, पण त्यांचे कार्यकर्ते आणि भाजपाचे पूर्वीपासूनचे कार्यकर्ते यांच्यात समन्वय निर्माण होऊ शकला नसल्याचे चित्र सध्या तरी दिसते. शिवसेनेतून आलेले नाना अंबोले, प्रभाकर शिंदे, तसेच बबलू पांचाळ यांच्या पत्नीच्या वॉर्डात फेरफटका मारला असता ही बाब जाणवते. मराठी मतदारांचा टक्का जास्त असलेले भाग हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जातात. त्या ठिकाणी जास्त आणि इतर भागात कमी मतदान झाले तर त्याचा मोठा फायदा शिवसेनेला तर तितकाच मोठा फटका भाजपाला बसू शकतो. हिंदी, गुजराती आणि दाक्षिणात्य बहुसंख्य असलेल्या भागांमध्ये ‘आपले’ मतदार कोण हे हुडकून त्यांना जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रावर आणण्यासाठी भाजपानेही रणनीती आखली आहे. त्यासाठीची जबाबदारी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना देण्यात आली असल्याचे प्रचार यंत्रणेतील एका नेत्याने सांगितले. मराठीबहुल भाग शिवसेना वा मनसेचा आहे असे समजून वाऱ्यावर न सोडण्याच्या सूचना त्या भागातील भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. दादर-माहीम हा सेना-मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर या ठिकाणी निवडून आले. मनसेचे नितीन सरदेसाई दुसऱ्या क्रमांकावर होते, पण भाजपाला तिसऱ्या क्रमांकाची तब्बल ३३ हजार मते मिळाली होती. याचा अर्थ सेना-मनसेच्या गडातही भाजपाचा मतदार आहे हे समजून लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मुंबई भाजपाच्या कार्यालयात विनाकारण गर्दी करणारे कार्यकर्ते, नेते व पदाधिकाऱ्यांना आपापल्या वॉर्डात मोर्चेबांधणी करा, इथे दिसू नका, असे बजावले जात आहे. मुंबईच्या आखाड्यात नितीन गडकरी- भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभांचा किल्ला लढवत असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेंकय्या नायडू, पुरुषोत्तम रूपाला, अभिनेते खासदार मनोज तिवारी यांच्या प्रचारसभा होणार आहेत. नायडू यांना दाक्षिणात्य मतदारांना आकर्षित करण्यास, रूपाला यांना गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी तर भोजपुरी नायक-गायक असलेले मनोज तिवारी यांना बिहारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारात आणले जात आहे. ‘भाजपाने मुंबईसाठी काय केले,’ असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या सभांमधून करीत आहेत. त्याचे उत्तर उड्डाणपूलकरी गडकरी देणार आहेत.हायटेक वॉररूम मुंबईसह १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वाळकेश्वर भागातील भाजपाची हायटेक वॉररूम ही अ‍ॅक्शन मोडवर आहे. तेथे २०० तरुण-तरुणी काम करीत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटरवरून पक्षाचा प्रचार करण्याचे आणि अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याचे काम तेथून चालते. याशिवाय, निवडणुकीच्या घडामोडींवर या वॉररूममधून नजर ठेवली जाते. कोणत्या घडामोडीचा पक्षावर काय परिणाम होईल याचे विश्लेषण करून पक्षाला ‘फीडबॅक’ दिला जातो. ही वॉररूम प्रदेश भाजपा उपाध्यक्ष व निवडणूक विभागप्रमुख आ. मंगल प्रभात लोढा आणि प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय आहे.विकासरथ प्रचारातमुंबईच्या विकासाचा भाजपाने दिलेला जाहीरनामा, राज्य सरकारने मुंबईसाठी घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांचे विकासाचे व्हिजन याची माहिती देणारे एलईडी स्क्रीनयुक्त विकासरथ भाजपाने तयार केले असून, ते प्रत्येक वॉर्डात फिरत आहेत. मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्याकडे या विकासरथांची जबाबदारी देण्यात आली आहे.