शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा त्यांच्या मार्गाने, तर आम्ही आमच्या मार्गाने - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 3, 2015 18:24 IST

भाजपाला शिवसेनेसोबत यायचे नाहीये, हे दानवेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले असून ते त्यांच्या मार्गाने जाणार असतील तर आम्हाला आमचा मार्ग खुला आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ -  भारतीय जनता पक्षाला शिवसेनेसोबत यायचे नाहीये, हे दानवेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले असून ते त्यांच्या मार्गाने जाणार असतील तर आम्हाला आमचा मार्ग खुला आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण स्वत:हून भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणार नसल्याचे स्पष्ट केले. कडोंमपा आणि कोल्हापूरमध्ये भाजपाचाचा महापौर बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी भाजपाने त्यांचा मार्ग निवडला असल्याने आम्ही ताणाताणी करणार नाही, आम्ही आमच्या मार्गाने जाण्यास मोकळे आहोत, असे  सांगितले. 
कडोंमपामध्ये शिवसेनेला ५२ तर भाजपाला ४२ जागा मिळाल्या असून सत्तास्थापनेसाठी कोणाकडेही स्पष्ट बहूमत नसल्याने दोन्ही पक्ष राजकीय समीकरणे जुळवण्यात व्यस्त आहेत. मात्र सत्तास्थापनेसाठी भाजपासमोर सर्व पर्याय खुले आहेत, निसर्गाचे नियम पाळून पक्ष पुढील पाऊले टाकेल असे सांगत दानवे यांनी कडोंमपासह कोल्हापूरमध्येही भाजपाचाच महापौर बसवण्याचा आमचा प्रयत्न असेल असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता भाजपाला सेनेसोबत यायचं नाही हेच दानवेंच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे, त्यामुळे भाजपा जर त्यांच्या मार्गाने जाणार असेल तर आम्हीही आमच्या मार्गाने जाण्यास मोकळे आहेत, असे सांगितले.