शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पोटनिवडणुकीत भाजपाला यश

By admin | Updated: August 30, 2016 06:19 IST

महानगरपालिका, नगरपालिका व परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली. भाजपाला एकूण ११ जागा मिळाल्या.

मुंबई : महानगरपालिका, नगरपालिका व परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली. भाजपाला एकूण ११ जागा मिळाल्या. त्यात काटोल नगर परिषदेत नऊपैकी सात जागांचा समावेश आहे. नाशिकमध्ये दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले, ठाण्यात मात्र दोन्ही जागांवर पक्षाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मनसेची जादू संपलीनाशिक महानगरपालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले. प्रभाग क्रमांक ३५मध्ये मंदा ढिकले तर प्रभाग ३६मध्ये सुनंदा मोरे विजयी झाल्या. सत्तारूढ मनसेच्या ताब्यातील या दोन्ही जागा भाजपाने जिंकल्या. मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी मतदान केल्याने पक्षाच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांनी दोघांचे सदस्यत्व रद्द ठरविले होते. सेना उमेदवारांनी कडवी झुंज दिली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुश्की ओढवली.काटोलमध्ये सात जागांवर भाजपाकाटोल नगर परिषदेच्या पाच प्रभागांतील नऊ जागांपैकी सात जागांवर भाजपाने विजय मिळविला. शेकापला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकांना अपात्र ठरविल्यानंतर ही पोटनिवडणूक झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेच्या एका जागेवर नगराध्यक्ष आसिफ मोकाशी गटाच्या अश्विनी काशिद विजयी झाल्या. नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांना शिवसेना आ. सत्यजीत पाटील यांचा पाठिंबा आहे.अकोला जि.प.मध्ये भारिप : अकोला जिल्हा परिषदेच्या हातगाव सर्कलमध्ये भारिप बहुजन महासंघाने जागा कायम राखली. अकोला जिल्हा परिषदेवर ‘भारिप-बमसं’ची सत्ता आहे.औरंगाबादमध्ये भगवा अन् घड्याळबेगमपुरा वॉर्डात पुन्हा सेनेचा भगवा फडकला. युतीचे उमेदवार सचिन खैरे ७२३ मतांची विक्रमी आघाडी घेऊन विजयी झाले. बुढीलेन वॉर्डात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारून ‘एमआयएम’ उमेदवाराचा दारुण पराभव केला. राष्ट्रवादीच्या परवीन कैसर खान यांनी ३१६ मतांची आघाडी घेतली. लातूर महापालिका प्रभाग क्रमांक २ (अ)मध्ये काँग्रेसचे रमेशसिंह बिसेन ७३६ मतांनी विजयी झाले.