शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची रणनीती शिवसेनेला खाऊन टाकेल

By admin | Updated: July 1, 2016 04:05 IST

गेल्या काही वर्षांत भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांची सहकारी पक्षांबद्दलची भूमिका संशयास्पद झाली आहे.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- गेल्या काही वर्षांत भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांची सहकारी पक्षांबद्दलची भूमिका संशयास्पद झाली आहे. त्यांच्यासोबत जे जे पक्ष जोडले गेले त्यांनाच खाऊन टाकण्याचे, कायमचे संपविण्याचे काम भाजपातर्फे सुरू आहे. महाराष्ट्रातदेखील शिवसेनेसोबत तेच होत आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेला खाऊन टाकण्याचे काम भाजपातर्फे केले जाईल, अशी भविष्यवाणी जेडीयूचे ज्येष्ठ नेते खा. के.सी. त्यागी यांनी केली आहे.त्यागी हे औद्योगिक पार्लमेंटरी कमिटीचे अध्यक्ष आहेत. कमिटीच्या बैठकीसाठी ते मुंबईत आले होते. त्या वेळी लोकमतशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे बोट पकडून भाजपाला महाराष्ट्रात वाढवले. एक जमाने में, शिवसेना को वो बडा भाई कहते थे... पण आता शिवसेनेला अपमानित करण्याची एकही संधी भाजपा सोडायला तयार नाही. भाजपामध्ये आता ‘प्रतिशोध’ची भावना वाढीला लागली आहे. बदला घेण्याच्या वृत्तीने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना पछाडलेले आहे, असा आरोपही त्यांनी या मुलाखतीत केला. कधीकाळी आपणसुद्धा काँग्रेसच्या विरोधात तुरुंगात गेला होतात आणि आता त्याच काँग्रेससोबत तुम्ही बिहारमध्ये हातमिळवणी केली, त्याचे काय?त्यागी : डॉ. लोहियांचा त्या वेळी असणारा विचार वेगळा होता. तेव्हा कन्याकुमारी ते काश्मीर सगळीकडे काँग्रेस होती. गरिबांप्रति काँग्रेसला तेव्हा कणव नव्हती. सामाजिक न्यायासाठी सत्तेचा वापर करणे डॉ. लोहियांना अपेक्षित होते. त्यामुळे ती वेळवेगळी होती, पण आता काँग्रेससोबत लढण्यात समजूतदारपणा नाही. आताची लढाई लोकशाही वाचविण्याची आहे. काँग्रेसने कभी सांप्रदायिकता के साथ कॉम्प्रमाइज नही किया था... पण आता लव्ह जिहाद, बीफ, लोकसंख्या, इतिहास बदलणे, समान नागरी कायदासारख्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. योग करताना त्यात ओम् आणले जात आहे. देशात तिसरी आघाडी कशी उभी राहू शकेल?त्यागी : पंडित नेहरूंचा काळ वेगळा होता. त्यांच्या काळात कधीही कार्यकर्त्यांची उपेक्षा झाली नाही. जनतेशी बांधिलकी मानणाऱ्या नेत्यांना पक्षात स्थान होते, पण नंतर काँग्रेसमध्ये दरबारी राजकारण शिरले. कोणाशी लढायचे आहे, हे काँग्रेसने आधी ठरवायला हवे. त्यांचा शत्रू भाजपा आहे की अन्य विरोधी पक्ष आहेत, याचा निर्णय त्यांनी आधी घ्यायला हवा. त्यानंतर एक ‘आपसी तालमेल’ बनवावा लागेल. नितीशकुमार, लालू, शरद पवार, बिजू पटनायक अशा सगळ्यांना सोबत घ्यावे लागेल. तरच भविष्यात भाजपाशी लढणे सोपे जाईल. मोदींच्या मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियातून उद्योगात गुंतवणूक वाढेल का?त्यागी : दिखावे पे मत जाईये भाईसाब... आज छोट्या आणि मध्यम प्रकारच्या उद्योगात ४० लाख रोजगार कमी झाले आहेत. फक्त ५५० बड्या उद्योगांना ४७०० कोटींचे कर्ज दिले गेले आहे. ते कोणत्या आधारावर दिले गेले हे जनतेसमोर आले पाहिजे. उद्योगांची आर्थिक स्थिती चांगली नाही. मागासवर्गीयांना उद्योगासाठी कर्ज देताना पक्षपात केला जात आहे. कोणत्या उद्योगांना कर्ज दिले जावे याची शिफारस करताना सीडबीकडून भेदभाव होतो, त्यांना अपमानित केले जाते, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. मोदी सरकारच्या कामगिरीवर तुमचे मत काय?त्यागी : सगळ्या योजना बेमतलब आहेत... २५ वर्षांचे नियोजन समोर ठेवून काहीही होताना दिसत नाही. स्टील उद्योग अडचणीत आला आहे. कोट्यवधी छोटे व्यापारी अडचणीत आले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारा रोजगार अडचणीत आला आहे. एफडीएच्या बाबतीत तेच झाले. उद्योजक, छोटे व्यापारी यांचे वाईट दिवस यातून सुरू झाले आहेत. अ‍ॅन्टीलेबर लॉ उद्योगांवर लादला जात आहे. कॉर्पोरेट उद्योगांसाठी मात्र झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा अशा राज्यांतील आदिवासींची जमीन ताब्यात घेतली जात आहे. त्यांच्या मालकीचे जल, जंगल, जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे तरुण आदिवासी नक्षलवादाकडे वळू लागले आहेत. तुमच्या मते देश हुकूमशाहीकडे निघालाय?त्यागी : आज अघोषित आणीबाणीकडे आपण निघालोय. देशात लोकशाही टिकवण्याच्या गप्पा होत आहेत, पण भाजपा पक्षातच लोकशाही राहिलेली नाही. एकही भाजपाचा नेता ठामपणे आपली भूमिका मांडू शकत नाही किंवा काही चुकत असेल तर सांगू शकत नाही.जे काही चालू आहे ते सगळेएकच व्यक्ती केंद्रबिंदू मानूनचालू आहे. आज सीबीयआयचावापर वाईट पद्धतीने केला जातोय. ईडी, आयटी, सीबीआय यांचीभीती दाखवून लोकांची तोंडे गप्प केली जात आहेत. ही हुकूमशाही नाही तर काय?बिहारचा विकास झाला तर तेथून बाहेर पडणारे लोंढे थांबतील असे वाटत नाही का? त्यागी : बिहारला कोणतेही पॅकेज दिले गेलेले नाही. फक्त घोषणा केल्या गेल्या. भाजपा सरकारने निवडणुकीच्या काळात केलेल्या घोषणा काढून पाहा. बिहारी जनतेला घोषणेशिवाय काहीही मिळालेले नाही.