शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दक्षिणायनसाठी भाजपची रणनीती

By admin | Updated: August 29, 2014 00:58 IST

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर आता भाजपला कुठल्याही परिस्थितीत दक्षिण नागपूरची जागा शिवसेनेला सोडायची नाही. मात्र, जागा वाटपात ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेला

शिवसेनेला जागा गेल्यास अपक्ष रिंगणात उतरणारनागपूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर आता भाजपला कुठल्याही परिस्थितीत दक्षिण नागपूरची जागा शिवसेनेला सोडायची नाही. मात्र, जागा वाटपात ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेला सुटली तर दावेदारांपैकी एकाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याची तयारी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी चालविली आहे. भाजप नेत्यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत युती धर्माचे पालन केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. दक्षिण नागपूरची जागा शिवसेनेच्या कोट्यात आहे. युतीत ही जागा सेनाच लढेल, असे सेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख डॉ. दीपक सावंत यांनी नागपुरात स्पष्ट केले आहे. शिवसेनेतही दावेदारांची यादी मोठी आहे. माजी उपमहापौर व सेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, किरण पांडव यांच्यासह राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश घेतलेले किशोर कन्हेरे यांची नावे आघाडीवर आहेत. उमेदवारीसाठी ‘मातोश्री’वर थेट हजेरी लावणाऱ्या इच्छुकांची दुसरी यादीही मोठी आहे. लोकसभा निवडणुकीत दक्षिणमध्ये भाजपला तब्बल ६० हजार मतांची आघाडी मिळाली होती. हे यश भाजप कार्यकर्त्यांचे आहे, त्यामुळे या वेळी ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरला आहे. भाजपमध्येही इच्छुकांची यादी मोठी आहे. नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश घेतलेले माजी आ. मोहन मते, माजी आ. अशोक मानकर आदी कंबर कसून तयार आहेत. सर्वांनी आपापल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)भाजपचा छुपा करारसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणमधील भाजप नेत्यांनी आपसात एक छुपा करार केला आहे. जागा भाजपच्या कोट्यात आली तर पक्ष उमेदवारी देईल त्याला पाठबळ द्यायचे. शिवसेनेलाच जागा गेली तर मात्र आपल्यापैकी एकाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून सर्वांनी त्याच्यासाठी काम करायचे. यासाठी काही इच्छुक नेत्यांनी विविध एजन्सींकडून सर्वेक्षणही करून घेतले आहे.