शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

भाजपा- शिवसेना येणार आमनेसामने

By admin | Updated: May 11, 2017 02:32 IST

राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर आतापर्यंत मौन असलेल्या भाजपाने अचानक यू-टर्न घेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर आतापर्यंत मौन असलेल्या भाजपाने अचानक यू-टर्न घेत, शिवसेनेची झोप उडवली आहे. या शुल्कवाढीवर काँग्रेसने यापूर्वीच आक्षेप घेतला आहे. त्यात भाजपानेही विरोधाचा झेंडा फडकावून सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याची तयारी केली आहे. महापालिकेत जवळपास समान संख्याबळ असलेले भाजपा विरोधकांशी हातमिळवणी करून हा प्रस्ताव फेटाळण्याची दाट शक्यता आहे.भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील पेंग्विन कक्षावरून अनेक वाद निर्माण झाले. यात आघाडी घेत भाजपाने सर्वप्रथम शिवसेनेवर निशाणा साधला होता. मात्र, त्यानंतर पेंग्विन दर्शन व राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर भाजपाने मौन बाळगले होते.गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला, तेव्हाही भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. नुकताच हा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजूर झाला. त्यावेळेसही बघ्याची भूमिका घेणाऱ्या भाजपाने आता शिवसेनेला अडचणीमध्ये आणले आहे.राणीच्या बागेत सध्या १२ वर्षांखालील मुलांसाठी दोन रुपये, तर प्रौढांसाठी पाच रुपये आकारण्यात येतात. यात वाढ करीत आई-वडील आणि दोन मुलांना १०० रुपये, त्यांच्याबरोबर तिसरे अपत्य असल्यास प्रत्येकी २५ रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जाणार आहेत. तर मुलांसाठी २५ रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर रुपये आकारण्यात येतील. मात्र, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी टिष्ट्वट करून या प्रस्तावाला विरोध केला आहे. राणीबागेत सोयी-सुविधा नसताना शुल्क वाढवणे म्हणजे पर्यटक आणि नागरिकांवर अन्याय असल्याचे मत शेलार यांनी आयुक्त अजय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी, गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीतील हरित पट्ट्यातील ३३ हेक्टर जागा दिली जाणार आहे. मात्र, यासाठी चार हजार झाडांचा बळी देऊन कारशेड उभारली जाणार आहे. या प्रस्तावाला पूर्वीपासून शिवसेनेचा विरोध आहे. आता काँग्रेसनेही हीच भूमिका घेतल्यामुळे विरोधकांच्या मदतीने भाजपाच्या या प्रस्तावाला सुरुंग लावण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.नरिमन पॉइंट ते अंधेरी सीप्झपर्यंत धावणाऱ्या मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे वसाहतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात कारशेडसाठी जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरेच्या एकूण जागेपैकी ३३ हेक्टर जागा मेट्रो कारशेड, वर्कशॉप, वाणिज्य सी १ वापरासाठी आरक्षित करा, असा प्रस्ताव नगर विकास विभागाने महापालिकेकडे पाठवला आहे. या सूचनेप्रमाणे पालिकेने आरेमधील आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीसमोर सादर केला आहे. मात्र, पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ आणि भाजपाचे ८२ असे जवळपास समान सदस्य निवडून आले आहेत. यामुळे सुधार समितीतही शिवसेना आणि भाजपाची सदस्य संख्या समान आहे. राज्य सरकार भाजपाचे असल्याने, मेट्रो प्रकल्पासाठी लागणारी आरेची जागा मिळवून देण्यासाठी भाजपाचे सदस्य हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आरेमधील वृक्षतोडीस भाजपा वगळता, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व सर्वच पक्षांचा विरोध असल्याने, सुधार समितीच्या पुढच्या बैठकीत या प्रस्तावावरून भाजपा आणि इतर पक्षांत नव्याने खडाजंगी होण्याचे संकेत आहेत.