शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेत कलगीतुरा सुरूच; एकमेकांना आव्हाने

By admin | Updated: June 25, 2016 03:51 IST

भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना ‘शोले’ चित्रपटातील असरानीशी केल्यानंतर आता ‘आमच्या भरवशावर तुमचे सरकार आहे याचे भान ठेवा

मुंबई : शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षातील वाक्युद्ध आता चांगलेच पेटले असून, आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा केली जात आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना ‘शोले’ चित्रपटातील असरानीशी केल्यानंतर आता ‘आमच्या भरवशावर तुमचे सरकार आहे याचे भान ठेवा. अन्यथा, भुजबळ-पवारांच्या भरवशावर सरकार चालविण्याची तुम्हाला मुभा आहे,’अशा शब्दांत शिवसेनेने भाजपाला सुनावले आहे. खा. संजय राऊत यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना केंद्रातील मोदी सरकारची तुलना निजामाशी केली होती. त्यानंतर भाजपा प्रवक्ते भांडारी यांनी पक्षाच्या पाक्षिकात लेख लिहून उद्धव यांची तुलना ‘शोले’ चित्रपटात आसरानीने साकारलेल्या जेलरशी केली. निजामाच्या बापाच्या बिर्याणीवर ताव मारायचा आणि वरून यजमानांच्या नावानं बोटं मोडायची ही कुठली ‘सच्चाई’? असा थेट सवालही केला. हा पलटवार सेनेच्या थेट वर्मी लागला. त्यामुळे खा. राऊत यांनी आज थोडी बचावात्मक भूमिका घेतली. ते म्हणाले, भाजपाचे काही लोक ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करीत आहेत त्यांची ही भूमिका अधिकृत आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा. धोरणांवर टीका होऊ शकते, पण व्यक्तिगतरीत्या खालच्या स्तरावर जाऊन काही फडतूस मंडळी शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका-टिप्पणी करीत असतील तर ही त्यांच्या अकलेची दिवाळखोरीच आहे. बहुधा यांना स्वत:चे सरकार बुडवायचे आहे. आमच्या पाठिंब्यावर तुमचे सरकार चालू आहे याचे भान ठेवा. नाहीतर छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार चालविण्याची तुम्हाला मुभा आहे. जनता काय तो फैसला करील. शिवसेनेत प्रचंड खदखद आहे. ही खदखद उफाळली तर भारी पडेल, असा इशाराही खा. राऊत यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी) संयम ठेवा - दानवेदोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविषयी बोलताना आदरभाव व्यक्त केला पाहिजे, अशी अपेक्षा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे. कोण्या एखाद्या वर्तमानपत्रात एखादी बातमी प्रसिद्ध केली म्हणून ते पक्षाचे मत होत नाही. वर्तमानपत्राला स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन दानवे यांनी केले आहे. अमित शहा तर ‘गब्बरसिंग’!सेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी अमित शहा यांची तुलना ‘शोले’मधील खलनायक ‘गब्बरसिंग’शी केली आहे. अमित शहा या भूमिकेला हुबेहुब शोभतात. त्यांचा कारभारदेखील तशाच प्रकारचा असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.