शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेना सरकार चालवतेय की पोरखेळ करतेय? - राधाकृष्ण विखे पाटील

By admin | Updated: January 28, 2016 20:14 IST

भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणेच्या मुद्यावरून राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी केलेला खुलासा पाहता भाजप व शिवसेना सरकार चालवत आहेत की पोरखेळ करीत आहेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणेच्या मुद्यावरून राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी केलेला खुलासा पाहता भाजप व शिवसेना सरकार चालवत आहेत की पोरखेळ करीत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.अचानक गृहनिर्माण मंत्री भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्तावच विचाराधीन नसल्याचे सांगत असतील तर इतके दिवस हे सरकार झोपले होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. जर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नव्हता; तर पहिल्याच दिवशी स्पष्टीकरण देऊन सरकारने हा वाद का संपवला नाही? वातावरण चिघळेपर्यंत प्रतीक्षा का केली गेली? या प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजे.या प्रकरणात शिवसेनेचीही भूमिका हास्यास्पद आहे. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी असून, सदरहू प्रस्ताव विचाराधीन आहे की नाही, याची शहनिशा न करता ते थेट आंदोलकाच्या भूमिकेत उतरले. सरकारमध्ये काय सुरू आहे, याची शिवसेनेला अजिबातच कल्पना नसल्याचे या प्रकारातून सिद्ध झाले.

सचिन अहिर यांची संतप्त प्रतिक्रिया - 

मुंबईतील लाखो भाडेकरुंवर वाढीव भाड्याचा भार लादणारा प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा रद्द करण्याची सरकारने केलेली घोषणा हा मुंबईकरांचा विजय आहे, अशा शब्दांत माजी गृहनिर्माण राज्यमंत्री मा. श्री. सचिन अहिर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा प्रस्तावित कायदा रद्द व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन जनमताचा रेटा निर्माण करणार्या सर्वांचे त्यांनी यावेळी आभारही मानले. तसेच बीडीडी चाळ पुनर्विकास, धारावी पुनर्विकास प्रकल्प तसेच नव्या गृहनिर्माण धोरणातही मुंबईकरांच्या हिताच्या तरतुदींचा समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.