शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेत दिलजमाई!

By admin | Updated: June 19, 2017 02:57 IST

राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरविताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सर्व घटक पक्षांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याने

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरविताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सर्व घटक पक्षांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याने भाजपाच्या उमेदवारास समर्थन देण्याची तयारी शिवसेनेने दर्शविली. तसेच, दोन्ही बाजूंचे मतभेद संपवून सरकारमध्ये एकदिलाने काम करण्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शविल्याचे समजते.राष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि भाजपा-शिवसेनेत ताणल्या गेलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेदेखील या बैठकीला उपस्थित होते. सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीसह अन्य विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) राहण्याचे शिवसेनेने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेने यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि कृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांची नावे सुचवली होती. पण, भाजपाकडून एखादे चांगले नाव आल्यास त्याचाही विचार करू, असे स्वत: उद्धव यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत भाजपाच्या संसदीय बोर्डाची बैठक व्हायची आहे. त्यात आम्ही उमेदवार निश्चित करू. मात्र, हा उमेदवार ठरवताना सर्व घटक पक्षांना विश्वासात घेण्यात येईल, असे अमित शहा यांनी सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमचा उमेदवार ठरवा, आम्हाला कळवा, आमचे त्याला समर्थन असेल. या निवडणुकीत ‘एनडीए’सोबत राहण्याचे शिवसेनेने मान्य केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही पक्षांत आलेली कटुता, त्यातून एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप यासंदर्भातसुद्धा यावेळी चर्चा झाली. दोन्ही बाजूचे मतभेद संपवून सरकारमध्ये एकदिलाने काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवल्याचे समजते. अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील ‘मातोश्री’वर गेले होते. मात्र, दानवे यांना बैठकीत स्थान देण्यात आले नसल्याचे समजते. भाजपाकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून धोरणात्मक बैठकीत दानवे यांचा सहभाग होता, असा दावा पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.