शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-सेनेत मतप्रदर्शन, पण, गैरसमज होणार नाहीत; मंत्री आशिष शेलारांनी केले स्पष्ट

By नितीन काळेल | Updated: June 11, 2025 19:33 IST

जिल्ह्यातील निवडणुकीबाबत भाजप जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील 

नितीन काळेल सातारा : ठाकरे बंधू आणि पवारही एकत्र येणार हे त्या दोघांनाही माहीत आहे का ?, अगोदर त्यांना ठरवू द्या. दोघांपैकी कोणीही त्याबद्दल सांगू द्या, त्यानंतरच आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ, असे खोचक उत्तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. तसेच, सातारा जिल्ह्यातील आगामी निवडणुकीबाबत भाजप जिल्हाध्यक्ष निर्णय घेऊन काय ते सांगतील, असेही एका प्रश्नावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.   सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी मंत्री शेलार यांनी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. राज्य शासनाच्या वतीने आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासाठी आल्यावर पत्रकारांशी ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार डाॅ. अतुल भोसले, माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर, मदन भोसले, आमदार मनोज घोरपडे आदी उपस्थित होते.मंत्री शेलार म्हणाले, सातारा जिल्ह्यात सातारा आणि परिसरातील भाग हा चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणासाठी उत्तम ठिकाण आहे. याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत धाेरण निश्चित करण्यात येईल. जलसंधारण विभागातील बदल्यात अनियमितता असल्याबाबतच प्रश्न करण्यात आल्यावर त्यांनी याबाबत संबंधित मंत्री योग्य काम करत असतील, असे सूचक वक्तव्य केले. तसेच, सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वत: लढणार की, युती करून, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री शेलार यांनी हा अधिकार भाजप जिल्हाध्यक्षांचा आहे. योग्यवेळी निर्णय होईल. त्यानंतर जिल्हाध्यक्षच काय ते सांगतील, असे उत्तर दिले.भाजप-सेनेत मतप्रदर्शन; पण, गैरसमज होणार नाहीत..पत्रकारांनी भाजप आणि शिंदेसेनेत धुसफूस सुरू आहे. सातारा जिल्ह्यातही सेनेच्या विरोधातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. पालकमंत्र्यांची काेंडी केली का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री शेलार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई हे महायुतीतील आहेत. अनुभवी आहेत. दोन्ही पक्षांत धुसफूस नाही. मतप्रदर्शन आहे. पण, आमच्यात गैरसमज होणार नाहीत याची चिंता करू, असे स्पष्ट केले. तर मंत्री नीतेश राणे यांच्याबद्दलच्या प्रश्नावर त्यांनी याबाबत मुख्यमंत्री बोलले आहेत, असे सांगून अधिक बोलणे टाळले.