शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

निवडणुकीमुळे भाजपला शिवछत्रपतींची आठवण - राणे

By admin | Updated: September 24, 2014 15:31 IST

आधी निवडणुका आल्यावर भाजपला रामाची आठवण यायची. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने भाजपला शिवछत्रपतींची आठवण येते असा टोला काँग्रेस नेते नारायण राणे यांनी लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ -  आधी निवडणुका आल्यावर भाजपला रामाची आठवण यायची. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने भाजपला शिवछत्रपतींची आठवण येते असा टोला काँग्रेस नेते नारायण राणे यांनी लगावला आहे. महाराष्ट्र भाजपकडे सक्षम नेता नसल्याने भाजपच्या बॅनरवर मोदींचेच फोटो झळकत आहेत अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. भाजपने मुंबईत लावलेल्या बॅनरवर शिवछत्रपतींचा आशिर्वाद असा उल्लेख केला आहे. तसेच  या बॅनर फक्त मोदींचे छायाचित्र असून त्यावर चलो मोदी के साथ असेही म्हटले आहे. यावरुन राणेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील डायमंड उद्योग गुजरातमधील अहमदाबादमध्ये स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या रिझर्व बँकेतील तीन महत्त्वाचे विभाग दिल्लीत नेले जात आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आहे असेही राणेंनी सांगितले. शिवाजी महाराज महाराष्ट्रातील लोकांना त्यांचे आशिर्वाद देतील, गुजरातच्या लोकांना का देतील असे सांगत केंद्रात सत्तेवर आल्यावर भाजपने मुंबई समुद्रकिनारी होणा-या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला आर्थिक मदत का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
गोळीचे उत्तर गोळीनेच देऊन अशी सिंहगर्जना करणारे नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर किमान ५० वेळा शेजारी राष्ट्राने गोळीबार केला आहे. आता मोदींनी गोळी खिशात ठेवायला घेतली आहे का असे खोचक सवालही राणेंनी उपस्थित केला. मुंबईतील जेएनपीटी बंदरातील व्यवहार गुजरातमध्ये नेऊन जेएनपीटीच्या ताब्यातील १८०० एकर जमिन एका उद्योजकाच्या खिशात घालण्याचा भाजपचा डाव आहे असा गंभीर आरोपही राणेंनी केला आहे. सध्या फक्त गांधीनगर आणि अहमदाबादचाच विकास केला जात आहे असा आरोपही राणेंनी केला.