शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत?

By admin | Updated: March 23, 2017 21:27 IST

शिवसेनेची आडमुठी भूमिका, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून झालेली कोंडी या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यात सरकार टिकवण्यासाठी नव्या समिकरणांची चाचपणी सुरू केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून सातत्याने घेण्यात येत असलेली आडमुठी भूमिका, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांकडून झालेली कोंडी या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने राज्यात सरकार टिकवण्यासाठी नव्या समिकरणांची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी इतर पक्षातील आमदारांना आपल्या पक्षात घेणे किंवा थेट मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणे, या पर्यायांची आज झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली.    आज सहकारमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या घरी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत  भाजपाकडून दोन पर्यायांवर चर्चा झाली आहे. शिवसेनेकडून सरकारला अडचणित आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नाराज आहेत. दरम्यान, आज झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत मध्यावधी निवडणुका आणि भाजपाच्या संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 29 आमदारांना पक्षा प्रवेश देण्याच्या पर्यायावर चर्चा झाली.
मध्यावधी निवडणुकांसाठी किती आमदारांची तयारी आहे. तसेच मध्यावधी निवडणुका झाल्यास पक्षाची कामगिरी कशी राहील, याबाबत राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांशी सल्लामसलत केली आहे. तसेच संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांरांनी पक्षात प्रवेश देण्याचा पर्याय भाजपासमोर आहे. अशा आमदारांना भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आणून बहुमताचे गणित सोडवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. 
तसेच विरोधकांकडून सातत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होत असताना अचानक कर्जमाफीची घोषणा करून त्यानंतर मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याचाही पर्याय भाजपासमोर आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे.