मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर लगेच दुस-याच दिवशी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीने १७२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.पक्षाचे सरचिटणीस जगत प्रकाश नड्डा यांनी नवी दिल्लीत जाहीर केलेल्या या यादीत पक्षाच्या ३५ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना मुंबईत बोरिवलीतून उमेदवारी देण्यात आली आहे.यादीत माधुरी मिसाळ आणि पंकजा मुंडे या दोन विद्यमान आमदारांसह १५ महिलांचा समावेश आहे.सोबत येणाऱ्या मित्रपक्षांसाठी सोडायच्या २५-३० जागा वगळून विधानसभेच्या राहिलेल्या २६३ ते २६८ जागा भाजपा लढवील, असे समजते. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शनिवार हा शेवटचा दिवस असल्याने पक्षाची उर्वरित उमेदवारांची यादीही शुक्रवारी रात्रीच जाहीर होणे अपेक्षित होते. (विशेष प्रतिनिधी)पक्षाने जाहीर केलेली यादी अशी१) शहादा - उदयसिंह पडवी २) नंदुरबार - डॉ. विजयकुमार गावीत३) नवापूर - अनिल वसावे४) साक्री - मंजुळा गावीत५) धुळे शहर - अनिल गोटे६) सिंदखेडा - जयकुमार रावल७) शिरपूर - डॉ. जितेंद्र ठाकूर८) चोपडा - जगन्नाथ बाविस्कर ९) रावेर - हरिभाऊ जावळे१०) भुसावळ - संजय सावकारे११) जळगाव शहर - राजूमामा भोळे१२) जळगाव ग्रामीण - पी. सी. आबा पाटील१३) अमळनेर - अनिल पाटील१४) एरंडोल - मच्छिंद्र पाटील१५) जामनेर - गिरीष महाजन१६) मुक्ताईनगर - एकनाथ खडसे १७) मलकापूर - चैनसुख संचेती१८) चिखली - सुरेश खबुतरे२०) सिंदखेड राजा - गणेश मंते२१) जळगाव जामोद - डॉ. संजय कुटे२२) अकोट - प्रकाश भारसाखळे२३) अकोला (प) - गोवर्धन शर्मा२४) वाशिम - लखन मलिक२५) कारंजा - डॉ. राजेंद्र पटणी२६) धामणगाव रेल्वे - अरुण अडसड२७) बडनेरा - तुषार भारतीय२८) अमरावती - डॉ. सुनील देशमुख२९) तिवसा - निवेदिता चौधरी३०) दर्यापूर - श्रीकृष्ण बुंदिले ३१) मेळघाट - प्रभूदास बिलवलकर३२) मोर्शी - अनिल बोंडे३३) आर्वी - दादारावजी केत्चे३४) देवळी - सुरेश वाघमारे३५) हिंगणघाट - समीर कुनावर३६) उंबरेड - सुधीर पारवे३७) नागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस३८) नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे३९) नागपूर मध्य - विकास कुंभारे४०) नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख४१) नागपूर उत्तर - डॉ. मिलिंद माने४२) कामठी - चंद्रशेखर बावनकुळे४३) तुमसर - चरण वाघमारे४४) साकोली - बाळा काशिवार४५) अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले४६) गोंदिया - विनोद अगरवाल४७) आमगाव - संजय पुरम४८) अहेरी - अमरिश महाराज४९) राजुरा - संजय धोटे५०) बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार५१) ब्रम्हपुरी - अतुल देशकर५२) चिमूर - किर्तीकुमार भांगडिया५३) यवतमाळ - मदन येरावार५४) उमरखेड - राजेंद्र नाजरधने५५) भोकर - डॉ. माधवराव किन्हाळकर५६) लोहा - मुक्तेश्वर धोंडगे५७) नायगाव - राजेश पवार५८) मुखेड- गोविंद राठोड५९) वसमत - अॅड. शिवाजी जाधव६०) हिंगोली - तानाजी मुतकुळे६१) परभणी - अजय गव्हाणे६२) परतूर - बबनराव लोणीकर६३) बदनापूर - नारायण कुचे ६४) सिल्लोड - सुरेश बनकर६५) फुलंब्री - हरिभाऊ बागडे६६) औरंगाबाद पश्चिम - मधुकर सावंत६७) गंगापूर - प्रशांत बंब६८) विजापूर - एकनाथ जाधव६९) नांदगाव - अजय हिरे७०) मालेगाव बाह्य - पवन ठाकरे७१) बागलाण - दिलीप बोरसे७२) चांदवड - डॉ. राहुल अहेर७३) सिन्नर - माणिकराव कोकाटे७४) निफाड - भागवत बोरस्ते७५) नाशिक पूर्व - बाळासाहेब सानप७६) नाशिक मध्य - देवयानी फरांदे७७) नाशिक पश्चिम - सीमा हिरे७८) देवळाली - कॅ. कुणाल गायकवाड७९) इगतपुरी - परशुराम वाघेरे८०) डहाणू - पास्कल धनागरे८१) विक्रमगड - विष्णु सावरा८२) पालघर - दीपा संके८३) बोईसर - जगदीश धुडी८४) नालासोपारा - राजन नाईक८५) भिवंडी ग्रामीण - सीताराम पाटील८६) शहापूर - अशोक एर्नक८७) भिवंडी पूर्व - संतोष शेट्टी८८) मुरबाड - किसन कथोरे८९) उल्हासनगर - कुमार आयलानी९०) डोंबिवली - रवींद्र चव्हाण९१) मिरा भाईंदर - नरेंद्र मेहता९२) मुंब्रा-कळवा - अशोक भोईर९३) बेलापूर - मंदा म्हात्रे९४) बोरिवली - विनोद तावडे९५) दहिसर - मनीषा चौधरी९६) मागठाणे - हेमेंद्र मेहता९७) मुलुंड - सरदार तारासिंग९८) जोगेश्वरी ईस्ट - उज्ज्वला मोडक९९) दिंडोशी - मोहित कंबोज१००) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर१०१) चारकोप - योगेश सागर१०२) मालाड पश्चिम - डॉ. राम बारोट१०३) गोरेगाव - विद्या ठाकूर१०४) अंधेरी पश्चिम - अमित साटम१०५) अंधेरी पूर्व - सुनील यादव१०६) विलेपार्ले - अॅड. पराग अळवणी१०७) चांदिवली - सीताराम तिवारी१०८) घाटकोपर पश्चिम - रामकदम१०९) घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता११०) अणुशक्ती नगर - संदीप असोलकर१११) कुर्ला - विजय कांबळे११२) कालिना - अमरजित सिंग११३) वांद्रे पूर्व - महेश पारकर११४) वांद्रे पश्चिम - अॅड. आशिष शेलार११५) धारावी - दिव्या ढोले११६) सायन कोळीवाडा - कॅप्ट. तामिल सेल्वन११७) माहिम - विलास आंबेकर११८) वरळी - सुनील राणे११९) शिवडी -शलाका साळवी१२०) भायखळा - मधु चव्हाण१२१) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा१२२) मुंबादेवी - अतुल शहा१२३) कुलाबा - अॅड. राज के. पुरोहित१२४) पनवेल - प्रशांत ठाकूर१२५) उरण - महेश बाल्डी१२६) अलिबाग - राजू साळुंके१२७) शिरूर - बाबूराव पाचरणे१२८) बारामती - बाळासाहेब गावडे१२९) पुरंदर - संगीताराजे निंबाळकर१३०) मावळ - संजय (बाळा) भेगडे१३१) चिंचवड - लक्ष्मण जगताप१३२) पिंपरी - अमर साबळे१३३) वडगाव शेरी - जगदीश मुळीक१३४) कोथरुड - मेधा कुलकर्णी१३५) खडकवासला - भीमराव तपकिर१३६) पर्वती - माधुरी मिसाळ१३७) हडपसर - योगेश टिळेकर१३८) पुणे कॅन्टोन्मेंट - दिलीप कांबळे१३९) कसबा पेठ - गिरीश बापट१४०) अकोले - अशोक भांगरे१४१) नेवासा - बाळासाहेब मुरकुटे१४२) राहुरी - शिवाजीराव कर्डिले१४३) श्रीगोंदा - बबनराव पाचपुते१४४) कर्जत जामखेड - प्रा. राम शिंदे१४५) गेवराई - अॅड. लक्ष्मण पवार१४६) माजलगाव - आर. टी. देशमुख१४७) परळी - पंकजा मुंडे१४८) लातूर ग्रामीण - रमेश कराड१४९) लातूर शहर - शैलेश लाहोटी१५०) अहमदपूर - गणेश हाके१५१) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर१५२) औसा - पाशा पटेल१५३) तुळजापूर - संजय निंबाळकर१५४) मोहोळ - संजय क्षीरसागर१५५) सोलापूर शहर (उ) - विजयराव देशमुख१५६) अक्कलकोट - सिद्रामप्पा पाटील१५७) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख१५८) कराड दक्षिण - अतुल भोसले१५९) सातारा - दीपक पवार१६०) गुहागर - डॉ. विजय नातू१६१) रत्नागिरी - सुरेंद्र (बाळ) माने१६२) कणकवली - प्रमोद जठार१६३) सावंतवाडी - अतुल काळसेकर१६४) कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक१६५) करवीर - केरबा चौगुले१६६) कोल्हापूर उत्तर - महेश जाधव१६७) इचलकरंजी - सुरेश हाळवणकर१६८) मिरज - सुरेश खाडे१६९) शिराळा - शिवाजीराव नाईक१७०) पलूस-कडेगाव - पृथ्वीराज देशमुख१७१) खानापूर - गोपीचंद पडाळकर१७२) तासगाव-कवठे महांकाळ - अजीत घोरपडे
३५ विद्यमान आमदारांना भाजपाची पुन्हा उमेदवारी
By admin | Updated: September 27, 2014 05:04 IST