शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाध्यक्ष अमित शहा उद्या ठाण्यात

By admin | Updated: April 20, 2017 04:09 IST

स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान व स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने

ठाणे : स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान व स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २१ ते रविवार २३ एप्रिल या कालावधीत ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे एकोणतिसावे अ.भा. सावरकर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत.ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, भाषण, अभिवाचन, समारोप सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हे संमेलन रंगणार आहे. शनिवारी, २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११.३० यावेळेत ‘भारताची संरक्षण सिद्धता’ हा परिसंवाद एअर मार्शल भूषण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात मेजर शशिकांत पित्रे व कमांडर सुबोध पुरोहित हे वक्ते सहभागी होणार आहेत. दुपारी १२ ते १ यावेळेत ‘सावरकर आजच्या संदर्भात’ यावर प्रकाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली भाषण होणार असून वक्ते म्हणून शंतनू रिठे सहभागी होणार आहेत. दुपारी ३ ते ५ यावेळेत डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सावरकरांचे साहित्य विश्व’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून यात डॉ. शरद हेबाळकर व प्रमोद पवार सहभागी होणार आहेत. रविवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ९.४५ यावेळेत माधव खाडिलकरलिखित ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे अभिवाचन होणार असून यात वेदश्री ओक-खाडिलकर, संतोष वेरूळकर, सुनीता फडके हे कलाकार सहभागी होणार आहेत. सकाळी १० ते १२ यावेळेत डॉ. अशोक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतातल्या समाजसुधारणा : विविध प्रयत्न’ या विषयावर परिसंवाद होणार असून वक्ते म्हणून प्रा. रमेश कांबळे, डॉ. नीलम गोऱ्हे, अ‍ॅड. किशोर जावळे हे वक्ते सहभागी होणार आहे. दुपारी १२.३० ते १.३० यावेळेत चंद्रकांत शहासने यांच्या अध्यक्षतेखाली ‘अल्पज्ञात सावरकर’ या विषयावर भाषण होणार असून विक्रम एडके हे वक्ते सहभागी होणार आहेत. दुपारी ३ ते ४.४५ यावेळेत डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ‘सावरकरांवरील आक्षेप व निराकरण’ विषयावर होणाऱ्या परिसंवादात गजानन नेरकर व अरविंद कुलकर्णी सहभागी होणार आहे. समारोप सोहळा रविवार २३ एप्रिल रोजी सायं. ५ वा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी शिक्षण, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)