शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच नंबर वन!

By admin | Updated: January 10, 2017 05:19 IST

राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने

मुंबई/नागपूर : राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने बाजी मारली असून काँग्रेस ९१९ जागा आणि ३४ नगराध्यक्षांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिले.राज्यातील १९१ नगरपालिकांसाठी चार टप्प्यांत निवडणूक झाली. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय भाजपाच्या चांगलाच पथ्यावर पडला. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. पैशासाठी लोकांना बँकांसमोर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या. अनेकांनी लग्नकार्ये पुढे ढकलली. त्यामुळे नोटाबंदीचा सत्ताधारी भाजपाला फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, तो खोटा ठरला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि समस्त मंत्रिगण भाजपाने प्रचारात उतरविले होते. शिवाय, गरजेनुसार स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे धोरण पक्षाने ठेवल्याने त्याचाही फायदा भाजपाला झाला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुठेही प्रचाराला गेले नाहीत. त्याचा फटका सेनेला बसला. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि स्थानिक नेते प्रचारात उतरले होते. काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढविली. त्याचा फायदा झाल्याचे दिसून येते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण उडाली. स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि डझनभर नेत्यांनी शहरं पिंजून काढली तरी या पक्षाच्या पदरात केवळ २२ ठिकाणचे नगराध्यक्षपद पडले.

चौथा टप्पाही जिंकलाचौथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली. सात नगराध्यक्ष पदांसह सर्वाधिक जागा भाजपाच्या पारड्यात पडल्या आहेत. काँग्रेस व इतरांना दोन नगराध्यक्ष पदं मिळाली. चौथ्या टप्प्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

काटोलमध्ये ‘विदर्भ माझा’काटोलमध्ये भाजपातून बाहेर पडलेले चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या उमेदवारांना राजकुमार तिरपुडे यांच्या ‘विदर्भ माझा’ या पक्षाच्या चिन्हावर लढवित २३ पैकी १८ जागा जिंकून सत्ता मिळवली. विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदी निवडून आल्या. विदर्भाच्या नावावर नव्यानेच स्थापलेल्या पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याने विदर्भवाद्यांचे मनोबल उंचावले.