शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आता स्वबळाचे उद्दिष्ट

By admin | Updated: May 4, 2017 03:42 IST

सत्तेत राहून शिवसेनेचे इशारे देणे, धमक्या देणे सुरू आहे. नोटीस पीरियड असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच

कोल्हापूर : सत्तेत राहून शिवसेनेचे इशारे देणे, धमक्या देणे सुरू आहे. नोटीस पीरियड असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच २०१९ ला कोणत्याही परिस्थितीत देशात ४०० खासदार आणि महाराष्ट्रात १४४ आमदार हे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे. त्यासाठी एक आणि एक जागा महत्त्वाची आहे; म्हणून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापूर महानगरच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बुधवारी ते बोलत होते. मंत्री पाटील यांनी आगामी दोन वर्षांतील   भाजपचा नियोजित आराखडा मांडला. ते म्हणाले, २०१९ ची तयारी आता सुरू झाली आहे. केंद्रामध्ये आम्ही आणि मित्रपक्ष मिळून ३३८ आहोत; परंतु काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी ४०० खासदार ‘कमळ’ चिन्हावरील हवेत. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातही मित्रपक्षांसह आपल्याकडे १३७ आमदार आहेत. शिवसेनेची त्यामुळे मदत घ्यावी लागली. त्यामुळे स्थिर आणि शांततेत राज्य चालण्यासाठी भाजपचे १४४ आमदार आणि मित्रपक्षासह १७० आमदारांचे ध्येय आम्ही ठेवले आहे.  शहा तीन दिवस महाराष्ट्रात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देशभरात फिरण्यासाठी ७५ दिवसांचे नियोजन केले आहे. त्यातील १६ ते १८ मे असे तीन दिवस ते महाराष्ट्रात असतील. (प्रतिनिधी)माझा उदो उदो नकोयापुढच्या काळात कोणीही भाषणात माझा उदोउदो करू नये. मी माझ्या राज्यासाठी, पक्षासाठी, लोकांसाठी, समाधानासाठी काम करतो. करायचीच असेल तर भगव्याची, पक्षाची स्तुती करा. माझी नको. तसे कराल तर तुमचे गुण प्लस न होता मायनस होतील, हे लक्षात घ्या, असा दमच यावेळी चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना भरला.