शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला हवे अडीच वर्षे महापौरपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 05:02 IST

शिवसेनेबरोबर युती करायचीच असेल तर युतीमध्ये महापौरपद अडीच वर्षे भाजपाकडे घ्या, असा दबाव

यदु जोशी / मुंबईशिवसेनेबरोबर युती करायचीच असेल तर युतीमध्ये महापौरपद अडीच वर्षे भाजपाकडे घ्या, असा दबाव भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणल्याने आता मुख्यमंत्री काय मार्ग काढतात याबाबत उत्सुकता आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार, माजी अध्यक्ष आ. राज पुरोहित आदींनी अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. गेले दोन दिवस मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईतील नेत्यांची युतीबाबत मते जाणून घेतली. त्यावेळी महापौरपद आधीच वाटून घ्या, असा आग्रह मुंबईतील नेत्यांनी धरल्याचे समजते. आधी तर हे नेते युतीसाठी राजी नव्हते, शिवसेनेशी चर्चादेखील करू नका, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पण युतीसाठी सेनेशी चर्चा केली जाईल. राज्यात त्यांच्यासोबत सत्ता चालवायची आहे हेही लक्षात घ्या. चर्चाच नको, ही भूमिका स्वीकारली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कल्याण-डोंबिवली निवडणुकीत शिवसेना अन् भाजपा वेगवेगळे लढले. शिवसेनेने ५४ तर भाजपाने ४५ जागा जिंकल्या होत्या. निकालानंतर सत्तावाटपाचा करार करीत दोघेही एकत्र आले. आधी अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर, नंतर दीड वर्षे भाजपाचा तर शेवटच्या एक वर्षात शिवसेनेचा महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद आळीपाळीने एकेक वर्षे दोघांनी वाटून घेतले होते.केवळ जागावाटपाच्या आधारे युती नकोकेवळ जागावाटपाच्या आधारे युती होऊ नये. पदांचीपण वाटणी आधीच झाली पाहिजे.महापौरपदाबरोबरच स्थायी समितीचे अध्यक्षपददेखील आधीच वाटून घ्यावे. किमान दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याला मिळाले पाहिजे, यासाठीही हे नेते आग्रही होते.