शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

तरण तलावावरून भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली

By admin | Updated: April 8, 2017 01:56 IST

विकासकामांच्या श्रेयावरून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जुंपली आहे

पिंपरी : विकासकामांच्या श्रेयावरून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जुंपली आहे. ‘संभाजीनगर येथील जलतरण तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले आले. तलाव नागरिकांसाठी खुलाही केला आहे. श्रेयासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. या तलावाचे उद्घाटन करून दाखवावेच, असे आव्हान माजी महापौर मंगला कदम यांनी केले आहे. ‘निवडणुकीनंतरही हा तलाव बंदच होता. यामध्ये श्रेय वादाचा प्रश्न नाही. ज्येष्ठ नेत्यांनी हा विषय जास्त ताणू नये, असा सल्ला पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला.संभाजीनगर येथील जलतरण तलाव उभारला असून त्यांचे उद्घाटन डिसेंबर महिन्यात झाले होते. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर शनिवारी उद्घाटन भाजपाकडून करण्यात येणार आहे. त्याच्या निषेध कदम यांनी केला. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात विरोधी पक्षनेते योगेश बहल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक श्याम लांडे, नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसेवक नीलेश पांढारकर, फजल शेख आदी उपस्थित होते.मंगला कदम म्हणाल्या, ‘‘नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रभागात चमकोगिरी सुरू आहे. तलावाच्या उद्घाटनाची स्टंटबाजी सुरू आहे.’’(प्रतिनिधी)योगेश बहल म्हणाले, ‘‘ज्या नगरसेवकांनी हा प्रकार चालविला आहे. त्यांचीच महापालिकेत सत्ता आहे. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात इतर प्रभागाच्या तुलनेत अधिकचा निधी उपलब्ध करून घेत प्रभागात नवी विकासकामे उभारण्यासाठी काम करावे.’’सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘संभाजीनगरातील तरण तलावाचे निवडणुकीच्या घाई गडबडीत उद्घाटन केले होते. निवडणुकीनंतरही हा तलाव बंदच होता. यामध्ये श्रेय वादाचा प्रश्न नाही.’’