शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा - शिवसेनेच्या गळाभेटीला गुढीपाढव्याचा मुहूर्त

By admin | Updated: March 24, 2017 19:32 IST

29 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याला भाजपाचे दोन मंत्री शिवसेनेबरोबर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सत्तेत असून नेहमी भांडणा-या शिवसेना - भाजपामधील तणाव कितीही प्रयत्न तरी कमी होताना दिसत नाही आहे. याउलट रोज नव्या मुद्यांवर सत्तेतील हे दोघे भाऊ भांडताना दिसत आहेत. भाजपाला कोंडीत पकडण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसून वारंवार सरकारला अडचणीत आणत आहे. आपल्यातील हा दुरावा कमी करण्यासाठी भाजपाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 29 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याला भाजपाचे दोन मंत्री शिवसेनेबरोबर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
 
सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून सातत्याने घेण्यात येत असलेली आडमुठी भूमिका, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांकडून झालेली कोंडी या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने राज्यात सरकार टिकवण्यासाठी नव्या समिकरणांची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती समोर येत होती. त्यासाठी इतर पक्षातील आमदारांना आपल्या पक्षात घेणे किंवा थेट मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणे, या पर्यायांची गुरुवारी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. 
 
राजकीय समीकरणं पाहता भाजपा शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे 29 मार्चला भाजपाकडून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं समजतं आहे. युतीतील ताणलेले संबंध निवळावे यावर चर्चा करण्यासाठी हो दोन्ही नेते मातोश्रीवर जाणार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
 
शिवसेनेकडून सरकारला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत. दरम्यान, गुरुवारी झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत मध्यावधी निवडणुका आणि भाजपाच्या संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 29 आमदारांना पक्षा प्रवेश देण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. पण या दोन्ही पर्यायांवर बैठकीत 50-50% मतं पडली त्यामुळे यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत.
 
भाजपाच्या कोअर बैठकीत मध्यावधी निवडणुकांसाठी किती आमदारांची तयारी आहे. तसेच मध्यावधी निवडणुका झाल्यास पक्षाची कामगिरी कशी राहील, याबाबत राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांशी सल्लामसलत केली असल्याचं समोर आलं होतं. तसेच संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांरांनी पक्षात प्रवेश देण्याचा पर्याय भाजपासमोर आहे. अशा आमदारांना भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आणून बहुमताचे गणित सोडवण्याचा भाजपा प्रयत्न करेल असं बोललं जात होतं.