शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-मनसे कार्यकर्ते भिडले

By admin | Updated: March 14, 2016 02:50 IST

जनता दरबारसाठी कार्यालयाच्या दिशेने निघालेले भाजपा नेते मोहित कम्बोज यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर मनसैनिकांनी रविवारी हल्ला चढविला. भाजपा-मनसे आपआपसांत भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण

मुंबई : जनता दरबारसाठी कार्यालयाच्या दिशेने निघालेले भाजपा नेते मोहित कम्बोज यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर मनसैनिकांनी रविवारी हल्ला चढविला. भाजपा - मनसे आपआपसांत भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळेस पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. तब्बल दोन तासांनंतर परिस्थितीवर नियंत्रण आणत मनसे कार्यकर्त्यांना कुरार पोलिसांनी ताब्यात घेतले.‘उत्तर भारतीयांचे मुंबईत तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केले, तर त्याच्यापेक्षा दुप्पट तुमचे नुकसान करू,’ असे खुलेआम पत्र लिहून कम्बोज यांनी राज ठाकरेंना शनिवारी धमकी दिली होती. याच्या निषेधार्थ रविवारी दुपारच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी मोहित कम्बोज यांच्या कुरार येथील कार्यालयावर हल्लाबोल केला. त्यात भाजपाचे कार्यकर्ते जखमी झाले. (प्रतिनिधी)घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त एम. रामकुमार यांच्यासह कुरार, दिंडोशी आणि मालाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यास दुपारी २च्या सुमारास पोलिसांना यश आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त एम. रामकुमार यांनी दिली....म्हणून मनसे कार्यकर्ते भडकले राज ठाकरे यांच्याविरुद्ध पत्र लिहिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढविला. मी जनता दरबारसाठी जात असताना मनसेच्या अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. त्यांच्या तावडीतून आम्ही निघालो. नंतर आमच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले. यापैकी १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते, असे भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी ‘लोकमत’ला सांगितले.