शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

भाजपा आमदारांची घेतली जातेय हजेरी!

By admin | Updated: July 16, 2015 01:54 IST

भारतीय जनता पार्टीचे आमदार सध्या एका वेगळ्याच सक्तीने त्रस्त आहेत. विधान भवनात ते हजर आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना दर तासाला एक सही करावी लागत आहे.

- यदु जोशी,  मुंबईभारतीय जनता पार्टीचे आमदार सध्या एका वेगळ्याच सक्तीने त्रस्त आहेत. विधान भवनात ते हजर आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना दर तासाला एक सही करावी लागत आहे. सत्ताधारी आमदारांच्या अनुपस्थितीमुळे ऐनवेळी सरकारची तांत्रिक अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.आमदारांच्या सह्या घेण्याची जबाबदारी दहा आमदारांमागे एका आमदाराला देण्यात आली आहे. या आमदारांना एक छापील फॉर्म देण्यात आला आहे. आमदाराचे नाव, त्याची सही आणि किती वाजता सही केली असे तीन कॉलम त्यात आहेत. याबाबत एक आमदार म्हणाले की, दहा आमदारांच्या दिवसभर सह्या घेण्यातच माझा जास्त वेळ जातो; पण उपाय नाही, पक्षाचा आदेश आहे!साधारण ११ वाजता सभागृह सुरू होते. तेव्हापासून सभागृह संपेपर्यंत हा सहीप्रपंच भाजपाच्या आमदारांना करावा लागतो. ज्या आमदारांकडे सह्या घेण्याची जबाबदारी आहे त्यांना सह्या झालेले फॉर्म पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांच्याकडे रोज जमा करावे लागतात. ही नवीन सक्ती लागू झाल्याने भाजपाच्या आमदारांची विधानसभेतील उपस्थिती लक्षणीय वाढली आहे. आमदार सभागृहात किती वेळ देतात याचे रिपोर्ट कार्ड उपस्थितीच्या आधारे तयार करण्यात येणार असून, ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळात समावेशाची आस लावून असलेले आमदार तर न चुकता पूर्णवेळ सभागृहात हजर राहतात, असे सध्याचे चित्र आहे. शहा यांनी अलीकडील मुंबई भेटीत पक्षाच्या आमदारांनी अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त केले होते. आमदार आपापल्या मतदारसंघाला अधिकाधिक निधी मिळावा यासाठी मंत्री, अधिकाऱ्यांकडे चकरा मारत असतात. भाजपाच्या आमदारांना निधी देताना त्यांची सभागृहातील उपस्थिती किती हा निकषदेखील लावण्यात येणार असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. मंत्र्यांना पूर्ण वेळ दालनात राहण्याचे आदेशआपल्या खात्यासंबंधीचे प्रश्न असले वा कम्पल्सरी सिटिंग असेल तर मंत्री विधानसभेत वा परिषदेत बसून असतात. याशिवाय काही वेळ आपल्या दालनात बसून मंत्री निघून जातात असा आजवरचा बहुतेक मंत्र्यांबाबतचा अनुभव. मात्र, भाजपाच्या मंत्र्यांना सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून सभागृह संपेपर्यंत विधान भवनातच राहण्यास सांगण्यात आले आहे. आम्ही सत्तारूढ पक्ष आहोत आणि अधिवेशन चालविण्याची जास्त जबाबदारी आमची आहे. वर्षातून साधारणत: ९० ते १०० दिवस अधिवेशन असते. पक्षाच्या आमदारांनी जास्तीतजास्त वेळ विधानसभेत बसावे म्हणून दर तासाला हजेरी घेतली जात आहे. महत्त्वाची विधेयके, धोरणात्मक निर्णय घेताना मतदानाची वेळ आली तर आमदारांना शोधून सभागृहात आणण्याची धावपळ आजवर व्हायची. - राज पुरोहित, भाजपाचे विधानसभेतील मुख्य प्रतोदसभागृह सुरू झाल्यापासून सभागृह संपेपर्यंत हा सहीप्रपंच भाजपाच्या आमदारांना करावा लागतो. ज्या आमदारांकडे सह्या घेण्याची जबाबदारी आहे त्यांना सह्या झालेले फॉर्म पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांच्याकडे रोज जमा करावे लागतात. ही नवीन सक्ती लागू झाल्याने उपस्थिती वाढली आहे.