यदु जोशी - मुंबई
आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळणारच, असे भारतीय जनता पार्टीत कोणीही छातीठोकपणो सांगू शकत नाही. कारण, उमेदवार निवडीच्या अमित शहा पॅटनमुळे इच्छुकांचीच नव्हे, तर विद्यमान आमदारांची झोप उडाली आहे!
विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपाच्या कोणत्याही नेत्याने कोणाची व्यक्तिश: शिफारस करू नये किंवा कोणासाठी लॉबिंग करू नये, अशा सक्त सूचना शहा यांनी दिल्या आहेत. पक्षातील एखाद्या नेत्याचा खास आहे म्हणून कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही. ‘निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच संधी दिली जाईल, असे स्पष्टपणो बजावण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली.
सर्व जिल्ह्यांमध्ये गेलेल्या भाजपाच्या दोन निरिक्षकांनी प्रदेश कोअर कमिटीला प्रत्येक मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची नावे दोन आठवडय़ांपूर्वी दिली. प्रदेश कोअर कमिटीने त्यात छाननी करून प्रत्येक मतदारसंघातील दोन-तीन नावांचे पॅनेल अमित शहा यांच्याकडे पाठविले आहे. त्यात खुद्द प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हेही अपवाद नाहीत. त्यांच्या पश्चिम नागपूर मतदारसंघातून त्यांच्यासह दोन जणांची नावे पाठविण्यात आली आहेत.
शहा यांनी उत्तर प्रदेशमध्ये राबविलेला पॅटर्न महाराष्ट्रातही वापरला आहे. त्यांनी प्रदेशाने पाठविलेल्या इच्छुक उमेदवारांच्या यादीचे सव्रेक्षण नामवंत खासगी संस्थेकडून सुरू केले आहे.
शहा यांची मदार मुख्यत्वे या सव्रेक्षणावर असेल. त्याचा फटका विद्यमान आमदारांनादेखील बसू शकतो. सव्रेक्षणात दुस:या इच्छुकाला कौल मिळाला तर आमदारांची गच्छंती होवू शकते.
जातीच्या निकषाऐवजी निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावला जाणार आहे. एखाद्या मतदारसंघात विशिष्ट जातीचे प्राबल्य आहे म्हणून त्या समाजाच्याच उमेदवाराला संधी द्यावी, असे केले जाणार नाही. शिवसेना जात पाहून उमेदवारी देत नाही. असा प्रयोग भाजपाला अजूनही जमलेला नाही.
ओबीसींऐवजी केवळ वंजारी!
भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष आ.पंकजा मुंडे यांची 28 ऑगस्टपासून सुरू होणारी संघर्ष यात्र मुख्यत्वे वंजारी समाज बहुल मतदारसंघांमधून जाणार आहे. पंकजा यांनी वंजारी समाजापुरते मर्यादित न राहता ओबीसींचे नेतृत्व करावे, असे भाजपामधील मुंडे समर्थकांना वाटते पण पंकजा यांनी आधी समाजात स्थान मजबूत करण्यावर भर दिला आहे.
अमित शहा यांनी उत्तर प्रदेशमध्ये राबविलेला पॅटर्न महाराष्ट्रातही वापरला आहे. त्यांनी प्रदेशाने पाठविलेल्या इच्छुक उमेदवारांच्या यादीचे सव्रेक्षण नामवंत खासगी संस्थेकडून सुरू केले आहे.