शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून भाजपा आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: April 3, 2017 12:09 IST

पिंपरी चिंचवड येथे भाजपा आमदाराच्या मुलीवर एक विद्यार्थाने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 3 - पिंपरी चिंचवड येथे भाजपा आमदाराच्या मुलीवर एक विद्यार्थाने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ला झालेली तरुणी यवतामाळ जिल्ह्यातील वणीचे भाजपा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मुलगी आहे. अश्विनी असे पीडित मुलीचे नाव आहे. हल्ल्यात अश्विनीच्या हाताची बोटं कापली गेलीत. सुदैवानं ती हातापासून वेगळी झालेली नाहीत. तिला उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अश्निनी आणि प्राणघातक हल्ला करणारा विद्यार्थी हे येथील बालाजी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. राजेश बक्षी असे हल्ला करण्याऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा हरियाणाचा आहे. 

पोलीसांनी आरोपी विद्यार्थाला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सत्तूर या धारदार शस्त्राने बक्षीने हा हल्ला केला. या हल्ल्यात विद्यर्थिनी गंभीर जखमी झाली आहे. वाकडच्या बालाजी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून संशयित आरोपी बक्षीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.