शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार देवराव होळी अपात्र,उच्च न्यायालयाचा निर्णय

By admin | Updated: January 19, 2017 22:39 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ.देवराव होळी यांना मोठा हादरा

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 -  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ.देवराव होळी यांना मोठा हादरा बसला आहे. लाभाचे पद भूषवित असतानाही निवडणूक लढली असल्याचे सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना अपात्र घोषित केले आहे. शिवाय २०१४ साली घेण्यात आलेली निवडणूक रद्द ठरविण्यात आल्याचा निकाल गुरुवारी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून उभे राहिलेले नारायण जांभुळे यांनी आमदार होळी यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर विशेष न्यायपीठाचे न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी हा निकाल दिला. ही याचिका २०१४ पासून प्रलंबित होती.
वैद्यकीय अधिकारी असताना डॉ.होळी यांनी सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी शकुंतला मोमोरियल संस्था उघडली होती.  २००८-०९ या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष म्हणून हा प्रकल्प राबविण्यात आला होता. जिल्हा परिषदेकडून एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत ३२ लाख ८२ हजार रुपये वितरीत करण्यात आले होते. डॉ. होळी यांनी आपल्या संस्थेत ५० कर्मचारी असल्याचे खोटे दस्तावेज सादर करुन ८ लाख ६८ हजार ३६३ रुपयांची उचल केली. होळी या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांचे काही  नातेवाईक अन्य पदांवर कार्यरत आहेत. १६ जानेवारी २०१३ रोजी  गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंश यांच्या  तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी होळी व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम  ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. होळी यांची ९ फेब्रुवारी  २००२ रोजी वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२, गट-अ) पदावर नियुक्ती करण्यात  आली होती. त्यांनी १९ आॅगस्ट २०१३ रोजी राजीनामा दिला होता. परंतु, १४  आॅक्टोबर २०१३ रोजी त्यांचा राजीनामा फेटाळण्यात आला होता. असे असतानाही  त्यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी अगोदर डॉ.होळी त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला व त्यानंतर अर्ज दाखल करुन घेण्यात आला. निवडणूक जिंकल्यानंतर  डॉ.होळी यांनी राजीनामा नामंजुरीला आव्हान देत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण नागपूर येथे याचिका दाखल केली. तेव्हा प्राधिकरणाने होळी यांची याचिका खारीज केली. या सर्व बाबी लक्षात घेता होळी हे विधानसभा निवडणूक लढविण्यास अपात्र होते असा दावा करत जांभुळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेत व साक्षीपुरावे तपासल्यानंतर हा निकाल दिला. जांभुळे यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे, तर होळींतर्फे अ‍ॅड. गणेश खानझोडे यांनी बाजू मांडली.