शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्यांचा मेंदू तपासावा लागेल

By admin | Updated: February 17, 2017 03:00 IST

‘सामना’वर मतदानाच्या काळात बंदी घालण्याच्या भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका

नागपूर : ‘सामना’वर मतदानाच्या काळात बंदी घालण्याच्या भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. आजवर ‘सामना’वर बंदीची मागणी पाकिस्तानमधून होत होती. मात्र त्या ‘सामना’वर बंदीची मागणी आता आमचे मित्र करीत आहेत. त्यामुळे या लोकांचा मेंदू तपासावा लागेल. यांचे हृदय कुणासाठी धडधडतेय याची तपासणी करावी लागेल. भाजपाचे नेते घाबरले आहेत, त्यांच्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांची तपासणी करू, असे राऊत म्हणाले.महापालिकेच्या निकालानंतरही भाजपा-सेना एकत्र येण्याची शक्यता नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर तलवारी बाहेर निघाल्या आहेत. त्या आता म्यान होण्याची शक्यता नाही, असे सांगत आम्ही केवळ सत्तेसाठी एकत्र येणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या प्रचारार्थ खा. राऊत येथे आले असताना म्हणाले, मुंबईत नेहमीच शिवसेना जिंकत आली आहे. या वेळीही जिंकेल. उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी युती तोडण्याची घोषणा केली. तेव्हापासूनच सरकारचा नोटीस पिरियड सुरू झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी आपले मार्गदर्शन ज्यांना गरज आहे, त्यांनाच द्यावे. भाजपामध्ये ‘पोलीस भरती’सारखी ‘गुंड भरती’ सुरू आहे. वैद्य यांनी आधी त्यांना मार्गदर्शन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)नागपूरचे काय शिकागो झाले का?-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी नागपूरकडे लक्ष द्यावे, नंतर मुंबईकडे पाहावे. मुंबईची तुलना पाटण्याशी करण्यापेक्षा गुन्हेगारीत नागपूर बिहारपेक्षाही पुढे गेले आहे, अशी टीका करीत मग नागपूरचे काय शिकागो झाले का, असा खोचक सवालही त्यांनी केला.विदर्भात ‘मिशन ५०’ : विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना सेना विदर्भात ‘मिशन ५०’ हाती घेऊन काम करेल. युतीमुळे नुकसान झाले नसते तर आणखी शिवसेना वाढली असती, असा आरोपही त्यांनी केला.