शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची टीका लागली भाजपाच्या जिव्हारी

By admin | Updated: January 23, 2017 04:57 IST

महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाच्या गोटात संतापाची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपा नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार मनोज कोटक, योगेश सागर यांच्यासह मुंबईतील भाजपा आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत २२७ जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांचा या वेळी आढावा घेण्यात आला असून, मुंबईकरांना अपेक्षित असलेल्या पारदर्शक कारभाराबाबतचे जाहीरनाम्यातील मुद्दे अंतिम करण्यात आल्याची माहिती आशिष शेलार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.या वेळी युतीबाबत शिवसेना आणि भाजपा नेत्यांदरम्यान झालेल्या बैठकांची माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिला. हा प्रस्ताव म्हणजे भाजपाचा अपमान आहे. त्यामुळे ही आता पक्षाच्या मानसन्मानाची लढाई बनली आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. रात्री उशिरा राज्यातील पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक बोलावण्यात आली. शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये युतीसंदर्भातील तिसरी बैठक शनिवारी पार पडली, पण या बैठकीत भाजपाकडून देण्यात आलेला ११४ जागांचा प्रस्ताव फेटाळत, केवळ ६० जागा सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखविली. त्यामुळे युतीबाबतच्या तिसऱ्या बैठकीतही तणाव कायम होता. दरम्यान, भाजपाची मुंबईतील ताकद पाहता, ६० जागाही जास्त आहेत. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दानशूर आहेत. त्यामुळे त्यांनी जागा दिल्या, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. (प्रतिनिधी)चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात-एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून मुखपत्राच्या माध्यमातून सतत भाजपावर शरसंधान सुरू असल्याने पक्षाचे नेते अस्वस्थ आहेत. तशात सेना भाजपाला सन्मानजनक जागा सोडण्यास तयार नसल्याने युतीबाबतचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच घेतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले.