शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने गुंडांना पावन करून घेतले - विखे

By admin | Updated: February 17, 2017 01:04 IST

गुंडांना पक्षात घेऊन नाशिकची शांत शहर असलेली ओळख पुसण्याचा भाजपाने प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील

नाशिक : गुंडांना पक्षात घेऊन नाशिकची शांत शहर असलेली ओळख पुसण्याचा भाजपाने प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला आहे. शिवसेना व भाजपाचे भांडण हा तमाशा असून, जनतेची निराशा करणाऱ्या सरकारला घालविण्यासाठी कॉँग्रेस पक्षच मदत करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.नाशिक महापालिकेच्या कॉँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. सरकार स्थापन करून अडीच वर्षे झाल्यानंतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारदर्शक कारभाराच्या गमजा मारत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या नाशिक येथील दोन व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या असून, एकात एबी फॉर्मसाठी भाजपा पक्ष कार्यालयातच दोन लाखांची मागणी तर भाजपा कामगार आघाडीच्या नेत्याला तिकिटासाठी दहा लाख रुपये मोजावे लागण्याची दुसरी क्लिप हाच काय भाजपाचा पारदर्शक कारभार, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांचे पुण्याचे नगरसेवक पारदर्शकतेची शपथ घ्यायला ज्या बसमधून गेले, त्या बसचे ५० रुपयांचे भाडेही त्यांना भरणे जिवावर आले आणि ते पारदर्शक कारभाराच्या शपथा घेणे म्हणजे विनोद असल्याचा टोला विखे-पाटील यांनी लगावला. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याचे सांगतात. मात्र, राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे न देता उद्धव ठाकरे यांच्याकडे देतात. म्हणजेच यांना राजीनामे द्यायचे नाही. भाजपा- शिवसेनेचे भांडण म्हणजे तमाशा आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी असेच राजीनामे देण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात निवडणुकीनंतर ते एकत्र आले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.