शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपालाही द्यावे लागेल रस्ते घोटाळ्याचे उत्तर

By admin | Updated: January 31, 2017 15:36 IST

नरेंद्र मोदी लाटेत मुंबईत पंधरा आमदार निवडून आणल्यानंतर महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याच्या भाजपाच्या आकांक्षेला धुमारे फुटले

गौरीशंकर घाळेमुंबई : नरेंद्र मोदी लाटेत मुंबईत पंधरा आमदार निवडून आणल्यानंतर महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याच्या भाजपाच्या आकांक्षेला धुमारे फुटले. स्वबळाचे वेध लागलेल्या भाजपाने वर्षभरापासूनच मित्रपक्ष शिवसेनेला लक्ष्य करत महापालिकेतील घोटाळे चव्हाट्यावर आणायला सुरुवात केली. पालिकेतील गैरव्यवहारांपासून पिच्छा सोडविण्यासाठी केलेली ही खेळी आता भाजपावरच उलटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याशी युतीची चर्चा कशी करता, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. नालेसफाई आणि रस्ते घोटाळ्याच्या मुद्दयावर भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर वारंवार निशाणा साधला. विशेषत: रस्ते घोटाळ्यावरुन महापालिकेची मोठी नाचक्की झाली. दुरुस्ती आणि रस्त्यांसाठी एकूण ३ हजार ४०० कोटींचे बजेट असतानाही मुंबईकर मात्र खड्डयांनी हैराण आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेला भाजपाने अप्रत्यक्षपणे शिवसेनालाच जबाबदार ठरविले. मात्र आता दोन्ही पक्षांत युतीची बोलणी सुरुझाल्याने घोटाळ्यांवरुन भाजपाने घेतलेल्या भूमिकेवर विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे. महापालिकेतील घोटाळ्याला भाजपाही तितकीच जबाबदार असल्याची आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. तर, ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याशीच युतीची चर्चा करणा-या भाजपाला नेमका कोणता पारदर्शक कारभार हवा, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.इतके दिवस भाजपाच्या आरोपांवर सावध भूमिका घेणारी शिवसेनाही आता बोलू लागली आहे. महापालिकेतच शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप का केले नाहीत, आशिष शेलार महापालिकेत भाजपाचे गटनेते होते, तेव्हा त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप का केले नाहीत, असा सवाल शिवसेनेचे मुंबईतील आमदार आणि रणनितीकार अनिल परब यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे एकूणच महापालिकेतील गैरकारभारापासून सुटका करुन घेण्याचा भाजपाचा प्रयत्न अंगलट आल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेच्या जोडीला भाजपाला रस्ते घोटाळ्याबाबत विरोधकांच्या मा-याला सामोरे जावे लागणार आहे.