शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वनजमीन हडपण्याचा भाजपाचा डाव

By admin | Updated: January 22, 2016 03:38 IST

पतंजलीला वनौषधी देण्याच्या बहाण्याचे रामदेवबाबांच्या माध्यमातून वनजमीन हडपण्याचा डाव भाजपाने रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे

मुंबई : पतंजलीला वनौषधी देण्याच्या बहाण्याचे रामदेवबाबांच्या माध्यमातून वनजमीन हडपण्याचा डाव भाजपाने रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच रामदेव बाबांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील २० टक्के (६० हजार वर्ग किलोमीटर) वनजमीन आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी पंतजली समूहाला देण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले आहे. वास्तविक, वनजमीन खाजगी व्यक्ती, संस्थेला देता येत नाही. तशी कुठल्याही कायद्यात तरतूद नाही. परंतु त्यासाठी वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ही जमीन देण्याचा घाट घातला जात असून, वनमंत्री मुनगंटीवार हे तर ‘जंगल बुक’मधील मोगलीसारखे वागत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला. आयुर्वेद क्षेत्रात डाबर, हमदर्द, बैद्यनाथ, झंडू, हिमालया, चरक, विको, इमामी यांसारख्या नामांकित संस्था वर्षानुवर्षे काम करत असताना २००६ साली स्थापन झालेल्या पतंजली उद्योगसमूहाला वनौषधी देण्याचा निर्णय का, असा सवाल करत जर आयुर्वेदला प्रोत्साहन द्यायचे असेल तर या क्षेत्रात शंभरहून अधिक वर्षे कार्यरत असणाऱ्या कंपन्याचादेखील विचार झाला पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी केली.