शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार विसर्जन मिरवणूक

By admin | Updated: September 19, 2016 00:40 IST

अच्छे दिनाची स्वप्ने दाखविणाऱ्या भाजपा-सेना सरकारने व्हॅटच्या दरात एक टक्का वाढ करून जनतेला महागाईची भेट दिली आहे.

पुणे : महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनाची स्वप्ने दाखविणाऱ्या भाजपा-सेना सरकारने व्हॅटच्या दरात एक टक्का वाढ करून जनतेला महागाईची भेट दिली आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विभागाच्या कार्यकर्त्यानी भाजपा-शिवसेना सरकारची विसर्जन मिरवणूक काढून महागाईच्या राक्षसाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे विसर्जन केले. लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या वेळी कसबा विभाग अध्यक्ष आशिष देवधर, उपशहराध्यक्ष प्रल्हाद गवळी, प्रकाश ढमढेरे, गणेश भोकरे, वसंत खुटवड, रवी सहाणे, विजय रजपूत, स्वप्निल फुगे, सागर पांगारे, नीलेश हांडे, वैभव पोंक्षे, शंकर भोसले, बबलू नाईक, नीलेश इनामके उपस्थित होते. (प्रतिनिधी)>दरवाढ रद्द न केल्यास आंदोलनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सर्व सामान्य नागरिकांना महागाई वाढीची ‘रिटर्न गिफ्ट’ देण्यात आले आहे. गणपतीचे विसर्जन होताच राज्याच्या मंत्रिमंडळाने दिवाळीपूर्वीच जनतेला महागाईची ही भेट दिली आहे. व्हॅटच्या दरातील वाढ आणि पेट्रोलवरील विक्रीकर दीड रुपया प्रतिलिटरने वाढविण्यात आला असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे मोटारसायकल, पेपर, मसाले, मिठाई, फळे, भाज्या आदी वस्तू महागणार आहेत. त्याचा मनसेतर्फे निषेध करण्यात आला. ही दरवाढ रद्द न केल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला.