शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने केले के. डी. शिंदेंना आमदार!

By admin | Updated: August 7, 2015 22:28 IST

केंद्राचे पत्र : गॅसचे अनुदान परत करा

सांगली : जिल्ह्यातील भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघनिष्ठ कार्यकर्त्यांना विधानपरिषदेच्या आमदारकीचे वेध लागले असताना, केंद्रातील भाजप सरकारने जनता दलाचे जिल्हाध्यक्ष के. डी. शिंदे यांनाच विधानपरिषदेचे आमदार केले आहे! आमदार म्हणून त्यांना केंद्राने पत्र पाठवून घरगुती गॅस सिलेंडरचे अनुदान परत करण्याची विनंती केली आहे. या पत्राने शिंदे कुटुंबियांनाही गुरुवारी अचानक धक्का बसला. डाव्या चळवळीतील खंदे कार्यकर्ते व जनता दलाचे नेते म्हणून के. डी. शिंदे सुपरिचित आहेत. विविध चळवळीत त्यांचा सहभाग असतो. त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी जनता दलाचे उमेदवार म्हणून रिंंगणात उडी घेतली होती. पण त्यांना आमदार होता आले नाही. आजअखेर जनता दलानेही त्यांना कधी आमदारकीची संधी दिली नाही. पण त्यांना ही संधी अखेर केंद्रातील भाजपने दिली! त्याचे असे झाले, केंद्र शासनाने अनुदानित गॅस सिलिंडरचे अनुदान परत करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर मोहीम उघडली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आमदार, खासदारांना पत्र पाठवून अनुदान परत करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार एक पत्र के. डी. शिंदे यांनाही गुरुवारी प्राप्त झाले. या पत्रात के. डी. शिंदे यांचा उल्लेख लोकनियुक्त प्रतिनिधी असा करण्यात आला असून, आपण विधानपरिषदेचे आमदार आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार गॅसचे अनुदान परत करावे, अशी विनंती केली आहे. हे पत्र हाती मिळताच शिंदे यांना काहीच सुचले नाही. पत्राच्या लखोट्यावरही पत्ता लिहिताना त्यांचा उल्लेख विधानपरिषदेचे आमदार असा करण्यात आला आहे. या पत्राने शिंदे कुटुंबीय अचं'िबत झाले. जनता दलाने शिंदेंना कधी आमदार केले नाही, पण भाजपने केले, अशी प्रतिक्रिया त्यांचे पुत्र अ‍ॅड. अमित शिंदे यांनी बोलून दाखविली. (प्रतिनिधी)