शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पडली तोंडघशी, मुंबई पालिका सर्वात पारदर्शी

By admin | Updated: February 2, 2017 08:38 IST

महापालिकेतील घोटाळ्यांसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवून प्रचार मोहिमेतून नाकाबंदी करण्याची व्यूहरचना आखणाऱ्या भाजपा नेत्यांना केंद्रातील स्वपक्षीय नेत्यांनी तोंडघशी पाडले

मुंबई : महापालिकेतील घोटाळ्यांसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवून प्रचार मोहिमेतून नाकाबंदी करण्याची व्यूहरचना आखणाऱ्या भाजपा नेत्यांना केंद्रातील स्वपक्षीय नेत्यांनी तोंडघशी पाडले आहे. मुंबई महापालिकेचा कारभार सर्वांत पारदर्शक असल्याचा निष्कर्ष अर्थ मंत्रालयाने आर्थिक पाहणीतून काढला आहे. एका केंद्राच्या या प्रशस्तीपत्रामुळे प्रचारात मोठे अस्त्र ठरणाऱ्या या मुद्द्याची हवाच गेली आहे.नालेसफाई, रस्ते, कचरा आणि ई निविदा घोटाळा गेल्या दोन वर्षांमध्ये गाजलेल्या या घोटाळ्यांचे भांडवल भाजपाने केले आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या भाजपाने शिवसेनेला चारही मुंड्या चित करण्यासाठी अशी मोर्चेर्बांधणी केली होती. भाजपाच्या सततच्या टिकास्त्राने शिवसेनेचे टेन्शन वाढवले होते. मात्र भाजपाच्याच केंद्रातील अरूण जेटली यांनी महापालिकेच्या पारदर्शक कारभाराचे तोंडभरुन कौतुक केले. प्रचाराच्या अस्त्राची धार बोथट ज्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. तोच मुद्दा आता मुख्यमंत्री आणि भाजपला मुंबई पालिका निवडणुकीत अडचणीचा ठरणार आहे. तर शिवसेनेला भाजपविरोधात आता रान उठविण्याची आयती संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा शिवसेना निवडणूक प्रचारासाठी घेईल, असे म्हटले जात आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेचा अभिनंदन ठराव केंद्रीय नेत्यांनी चांगल्या कारभाराची पोचपावती महापालिकेला दिल्यामुळे भाजपा नेत्यांवर तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे. हीच संधी साधून भाजपाला खिजवण्यासाठी शिवसेनेने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अभिनंदनाचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत आज मांडला. पारदर्शक कारभारात अव्वल असल्याची होर्डिंग्ज शहरात लावण्याची मागणी शिवसेनेने प्रशासनाकडे केली आहे.अर्थमंत्र्यांच्या या प्रशस्तिपत्रकामुळे सध्यातरी शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडले आहे. प्रचारात शिवसेना याच प्रशस्तिपत्रकाचा वापर ढालीसारखा करेल.