शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाप्रवेशाच्या लाटेला राजकारणाचा अटकाव

By admin | Updated: November 2, 2016 00:34 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य काही पक्षांमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या लाटेला पक्षांतर्गत राजकारणाने अटकाव केला

पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य काही पक्षांमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या लाटेला पक्षांतर्गत राजकारणाने अटकाव केला आहे. थेट मुख्यमंत्र्यांकडेच याबाबत तक्रार करण्यात आल्याने त्यांनीच पुढील प्रवेश तात्पुरते थांबविले असल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे. पक्षातील हा सुप्त संघर्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघड होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.खासदार संजय काकडे यांनी नगरसेवकांचे पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने मुंबईतील त्यांच्या वर्षा बंगल्यावर घडवून आणण्यास सुरुवात केली. त्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना नव्हती. पालिकेतील पक्षाचे गटनेते गणेश बीडकर मात्र त्याला उपस्थित होते. तिथेच पहिली ठिणगी पडली. बापट समर्थक कार्यकर्त्यांनी खासदार काकडे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतरही काकडे यांनी आणखी दोन प्रवेश घडवून आणले. मात्र त्या वेळी पालकमंत्री उपस्थित असतील याची काळजी घेतली. मात्र तरीही बापट समर्थक कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. दरम्यानच्या काळात शहरातील काही गुन्हेगार कार्यकर्त्यांची छायाचित्रे थेट मुख्यमंत्र्यांसमवेत झळकली. त्याची चर्चा सुरू झाली. त्याच वेळी मुंबईत वर्षा बंगल्यावर झालेल्या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाच्या वेळीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्ती उपस्थित असल्याचे जाहीर झाले. त्यांची छायाचित्रेही झळकली. त्याचेच निमित्त करीत पालकमंत्री बापट यांनी मुख्यमंत्र्यांकडे पक्षप्रवेश कार्यक्रमांबाबत तक्रार केली व पुण्यात याची चुकीची चर्चा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सुरुवातीला मुख्यमंत्र्यानीच फ्रि हँड दिलेल्या खासदार काकडे यांना आता मुख्यमंत्र्यांनीच सबुरीचा सल्ला दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्याच सांगण्यावरून खासदार काकडे यांनी त्यांच्या प्रयत्नांतून प्रवेश झालेल्या नगरसेवक व त्या वेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे साधे असून त्यातूनही ते निर्दोष सुटल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्धी माध्यमांना दिले. त्यानंतर मात्र आता पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पूर्ण थंडावले आहेत. कार्यकर्त्यांमधील चर्चाही कमी झाली आहे.(प्रतिनिधी)>भाजपात सध्या महापालिकेत आपली सत्ता आलीच असे वातावरण आहे. तसे झाले तर आपले नगरसेवक हवेत यासाठी नगरसेवकांची लॉबी तयार करण्याच्या प्रयत्नातूनच पक्षप्रवेश घडवून आणले जात असल्याची चर्चा आहे. अशी लॉबी असेल तर ती नंतरच्या कामांमध्ये उपयोगी पडू शकते असा विचार यामागे असल्याचे सांगण्यात येते.पालकमंत्री बापट तसेच खासदार काकडे दोघांनाही पालिकेवर नियंत्रण हवे आहे. त्यादृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. पक्षात अलीकडेच सक्रिय झालेल्या खासदार काकडे यांना राजकीयदृष्ट्या मर्यादा आहेत. तरीही अन्य काही बाबी त्यांच्या जमेला असल्याने त्यांनी कंबर कसली आहे. आणखी बरेच नगरसेवक संपर्कात असून, येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणणार असल्याचे काकडे जाहीरपणे सांगतात. तर दुसरीकडे बापटही पक्षात प्रवेश मिळाला याचा अर्थ उमेदवारी मिळाली असा होत नाही हे जाहीरपणे स्पष्ट करीत आहेत. दोघांमधील या सुप्त संघर्षामुळे पक्षप्रवेशाची लाट सध्या तरी थंडावली आहे.