शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा क्लीन बोल्ड, तर शिवसेना रनआउट

By admin | Updated: August 30, 2016 02:47 IST

ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीकडे सराव सामना म्हणा किंवा रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते

अजित मांडके , ठाणेठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीकडे सराव सामना म्हणा किंवा रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. या सराव सामन्यात भाजपा क्लीन बोल्ड झाली असून शिवसेनादेखील रनआउट झाली आहे. प्रभाग क्र. ३२ हा शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात अपक्ष उमेदवाराने सुरुंग लावून यश संपादन केले आहे. तर, दुसरीकडे ५३ मध्ये शिवसेनेला यश आले असले तरीदेखील एका प्रभागात पराभव पत्करावा लागल्याने शिवसेना या सराव सामन्यात रनआउट झाल्याचे म्हणावे लागणार आहे. तर, दुसरीकडे या सराव सामन्यात अपेक्षित यश संपादन करण्याची इच्छा बाळगून मैदानात उतरलेली भाजपा मात्र क्लीन बोल्ड झाल्याने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शतप्रतिशत भाजपाच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असा निकाल लागला आहे. प्रभाग क्र. ३२ अ मध्ये शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसला चारीमुंड्या चित करून अपक्ष उमेदवार स्वाती देशमुख यांनी १९४ मतांनी विजय मिळवला. तर, प्रभाग क्र. ५३ अ मध्ये शिवसेनेच्या पूजा करसुळे यांचा १८५ मतांनी विजय झाला. ३२ अ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार संगीता वाघ यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर दिग्गज मंडळींच्या येथे सभा झाल्या होत्या. असे असतानाही येथे शिवसेनेचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ भाजपा उमेदवाराने येथे मते खाल्ल्यानेच शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे आता खाजगीत बोलले जात आहे. परंतु, भाजपादेखील या ठिकाणी अपेक्षित मते मिळवण्यास अपयशी ठरली आहे. या प्रभागावर आधीच काँग्रेसचे वर्चस्व होते. पक्षाचे नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी राजीनामा दिल्याने हा प्रभाग आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेने आखलेली रणनीती अपयशी ठरली. प्रभाग क्र. ५३ मध्ये शिवसेनेला यश आले आहे. मागील निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला हा प्रभाग होता. त्यानुसार, भाजपाच्या उमेदवाराचा येथे निसटता पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा हा प्रभाग भाजपाने मागितला होता. परंतु, शिवसेनेने तो सोडला नाही. त्यामुळेच येथे भाजपाने उमेदवार उभा केल्याने तेथे खऱ्या अर्थाने युती तुटली. प्रत्यक्षात या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांना आपली ताकद आजमावयाची संधी होती. त्यात काही अंशी शिवसेना यशस्वी झाली असली तरी प्रभाग क्र. ३२ मध्ये भाजपाच्या उमेदवारामुळे शिवसेनेला धक्का बसला.