शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा मुख्यमंत्री हेच शिवसेनेचे दुखणे

By admin | Updated: March 5, 2015 02:10 IST

सत्तेत सहभागी होऊन सतत टीका करीत राहायचे, हे शिवसेनेने टाळले पाहिजे; जनतेलाही ते आवडत नाही, असा सल्ला देतानाच महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री झाला हेच शिवसेनेचे मूळ दुखणे आहे,

दानवेंचा टोला : युतीत मतभेदाची दरी रुंदावलीमुंबई : सत्तेत सहभागी होऊन सतत टीका करीत राहायचे, हे शिवसेनेने टाळले पाहिजे; जनतेलाही ते आवडत नाही, असा सल्ला देतानाच महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री झाला हेच शिवसेनेचे मूळ दुखणे आहे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे २१ विद्यमान आमदार आणि दोन अपक्ष आमदार भाजपात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे सांगत दानवे यांनी सतत सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला सूचक इशारा दिला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे खा. दानवे गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार या खात्याचे ते सध्या राज्यमंत्री आहेत. बुधवारी त्यांनी‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. शिवसेना सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेत आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता खा. दानवे म्हणाले, की आमच्याजवळ पुरेसे संख्याबळ नाही आणि त्यांना सत्तेशिवाय जमत नाही; त्यामुळे आम्ही एकत्र आलो. खरेतर हा संसार सुखाने चालला पाहिजे. त्यामुळे सेनेने सत्तेत राहून विरोधात बोलणे टाळले पाहिजे. सेनेशी सूर जुळत नसतील तर राष्ट्रवादीने देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा का घेतला नाही, असे विचारले असता भाजपा व सेनेचा मतदार एकच आहे. सत्तेकरिता कुणाशीही संगत केलेली मतदारांना पसंत पडत नाही, असे मार्मिक उत्तर त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)आंधळा पाठिंबा नाहीभूसंपादन विधेयक असो की सरकारच्या अन्य कुठल्याही निर्णयाला आंधळा पाठिंबा देणार नाही, असा स्पष्ट इशारा सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. येत्या महापालिका निवडणुकांत एकहाती सत्ता मिळवण्याकरिता कामाला लागण्याचे आदेशही ठाकरे यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना दिले.शिवसेनेमुळे बैठक रद्दभाजपा व सेनेच्या नेत्यांमधील समन्वय समितीची बैठक गुरुवारी होणार होती. मात्र भूसंपादन विधेयक असो की मुंबईचा विकास आराखडा उद्धव ठाकरे यांनी सातत्याने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाने ही बैठक टाळल्याची चर्चा आहे. भाजपाचे नेते दिल्लीत असल्याने बैठक पुढे गेल्याचे दानवे यांनी सांगितले.शिवसेनेचं वागणं कोणालाच पसंत नाहीपक्ष फुटण्याच्या भीतीने शिवसेना सत्तेत आली की सत्तेत सहभागी होण्याची त्यांची काही अन्य गणिते आहेत, या प्रश्नाचे उत्तर शिवसेनाच देऊ शकेल. आता सतत टीका करीत राहण्याचं सेनेचं वागणं जनतेलाही पसंत नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा सूचक इशारा दानवे यांनी दिला. सुखी ‘संसारा’साठी सेनेने विरोध टाळावाआमच्याजवळ पुरेसे संख्याबळ नाही आणि त्यांना सत्तेशिवाय जमत नाही; त्यामुळे आम्ही एकत्र आलो. खरेतर आता हा संसार सुखाने चालला पाहिजे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत राहून विरोधात बोलणे टाळले पाहिजे.