शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीवरून भाजपात खदखद

By admin | Updated: January 21, 2015 01:41 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला आलेली एकमेव जागा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना दिल्याने या जागेकरिता इच्छुक असलेले अनेकजण नाराज झाले आहेत.

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला आलेली एकमेव जागा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना दिल्याने या जागेकरिता इच्छुक असलेले अनेकजण नाराज झाले आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या आग्रहामुळे वाघ यांची वर्णी लागल्याने इतरांची नावे मागे पडली.विधान परिषदेच्या चार जागांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. शिवसेनेचे सुभाष देसाई, शिवसंग्रामचे विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना तीन जागा सोडल्यावर भाजपाकडे आपल्याकडील किमान दोन डझन इच्छुकांना देण्याकरिता केवळ एक जागा उरली होती. त्यावर जळगावमधील स्मिता वाघ यांची निवड केली गेली. त्या भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत. खडसे यांनी वाघ यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे या उमेदवारीकरिता प्रयत्नशील माधव भांडारी, शायना एन.सी., गणेश हाके, विनय नातू आदी मंडळी नाराज झाले आहेत. निवडणूक काळात भांडारी व शायना यांनी प्रवक्ते या नात्याने प्रसार माध्यमांत भाजपाची बाजू सातत्याने मांडली होती. त्यामुळे या दोघांपैकी एकाला विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या मागणीकरिता केलेल्या हिंसक अांदोलनामुळे त्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आहे. सदाभाऊ खोत हे त्यामुळे नाराज झाले आहेत. या सरकारसोबत राहायचे किंवा कसे याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)