शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘मटका’ आरोपाचा भाजपला ‘फटका’

By admin | Updated: November 5, 2015 00:25 IST

प्रचारातील टीका भोवली : तीनही उमेदवार पराभूत

विश्वास पाटील- कोल्हापूर --भाजपकडून मटकेवाल्यांना, गुन्हेगारीशी संबंधित व दारूगुत्तेवाल्यांना उमेदवारी दिल्याची जोरदार टीका प्रचारात शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी तर भाजपला उपरोधाने ‘मटका’ हे चिन्ह शोभून दिसले असते, असा आरोप केला होता. या टीकेचा फटका भाजपला बसला असल्याचे निकालावरून दिसते.शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीर सभेतच भाजपच्या तीन उमेदवारांवर गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये राजलक्ष्मीनगर प्रभागातील उमेदवाराचे पती दत्ता बामणे, नगरसेवक आर. डी. पाटील आणि दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातील हेमंत कांदेकर यांचा समावेश होता. या तिन्ही ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर असला तरी विजयापासून लांब राहिल्याचे निकालावरून दिसते आहे. राजलक्ष्मीनगर प्रभागात पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या वर्षा चावरे यांना डावलून तिथे काँग्रेसमधून आलेल्या शोभा बामणे यांना उमेदवारी दिली. गतनिवडणुकीत खुद्द चंद्रकांतदादा यांनीच दत्ता बामणे यांच्यावर टीका केली होती व त्यांनाच भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिल्याबद्दल पक्षावर टीकेची झोड उठली. प्रभागात भाजपचे हक्काचे मतदान असताना तिथे पक्ष पराभूत होण्यामागे ही टीकाच कारणीभूत ठरली.पक्षाचे महापालिकेतील सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक असलेले आर. डी. पाटील यांचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यांची कन्या महालक्ष्मी मंदिर प्रभागातून निवडणुकीस उभ्या होत्या. उच्चशिक्षित व तरुण उमेदवार असतानाही त्यांचा मोठा पराभव झाला. या पराभवात आर. डी. यांच्यावरील आरोपांपेक्षा त्यांनी शिवसेनेशी घेतलेला पंगा जास्त कारणीभूत ठरल्याचे दिसते आहे.दुधाळी पॅव्हेलियन प्रभागात पक्षाने हेमंत कांदेकर यांना उमेदवारी दिली होती. कांदेकर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याची टीका प्रचारात झाली होती. त्यांनी चांगली मते घेतली तरी जागा जिंकता आली नाही. भाजप हा साधनशूचिता मानणारा पक्ष आहे. गुंडा-पुंडांना उमेदवारी देणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जाहीरपणे सांगत होते व प्रत्यक्षात उमेदवाराचे फक्त ‘इलेक्टिव्ह मेरिट’च पक्षाने पाहिले. रायगड कॉलनी-बाबा जरगनगर प्रभागात भाजपने माजी जिल्हाध्यक्ष नाना जरग यांच्या स्नुषा वैभवी जरग यांना उमेदवारी नाकारली. श्रीमती जरग या प्रभागात स्पर्धेत नसल्याचा सर्व्हे असल्याचे पालकमंत्री सांगत होते परंतु ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून जरग यांनी जोरदार लढत दिली. तिथे भाजपच्या गीता गुरव अवघ्या २६ मतांनी विजयी झाल्या. पक्षाने त्यांच्या निष्ठेचा विचार केला नाही. त्याचा परिणाम म्हणून या दोन्ही प्रभागांत भाजपचा पराभव झाला. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यास तिथे संधी दिली असती तर विजय मिळाला असता असे चित्र दिसते. बंड केले; पक्ष पराभूत..शिवसेनेचे हाडाचे कार्यकर्ते असलेले व रिक्षाचालक सेनेचे प्रमुख राजेंद्र जाधव हे तटाकडील तालीम प्रभागातून इच्छुक होते, परंतु पक्षाने त्यांना डावलून माजी महापौर उदय साळोखे यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. जाधव यांना व्यक्तिगत करिश्मावर आणि सहानुभूतीमुळे तब्बल ९०२ मते मिळाली आणि साळोखे यांना पक्षाचे पाठबळ असतानाही ९०५. साळोखे यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत साळोखे यांनी अपक्ष लढून २६८ मते घेतली. तसा हा प्रभाग शिवसेनेचा हुकमी परंतु बंडखोरीमुळे पक्षाची हक्काची जागा कमी झाली. पांजरपोळ प्रभागातूनही कमलाकर जगदाळे यांच्या पत्नीस अपक्ष लढून २५२ मते मिळाली. या प्रभागात भाजपच्या भाग्यश्री शेटके विजयी झाल्या.