शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांच्या याचिकेमागे भाजपा?

By admin | Updated: January 13, 2017 04:04 IST

ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी

अतुुल कुलकर्णी / मुंबईऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमागे बोलविते धनी भाजपा नेतेच असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. तर दुसरीकडे चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सरकारविरोधात मूग गिळून असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर थेट आरोप ठेवणारी याचिका अण्णा हजारे यांनी केली खरी; परंतु आधी तक्रार नोंदवा, असे न्यायालयाने बजावले. अलीकडच्या काळात अण्णांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले सूत जमले आहे. त्यातूनच ही याचिका पुढे आल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर याचिका सुनावणीला आली असती, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली असती.मराठा मोर्चामुळे सरकारविरोधी वातावरण तयार झाले, असे बोलले जात असतानाच नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला. अन्य समाजाच्या लोकांनी मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान केले नाही, असा एक सूर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निघाल्याचे समजते. मुख्यमंत्री जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत; कारण त्यांना मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. दुर्दैवाने आमच्या पक्षात एकही नेता यावर मात करून ठाम भूमिका घेण्यास तयार नाही, सरकारच्या विरोधातबोलण्यासारखे असंख्य मुद्दे असताना आमच्या पक्षाचे नेते कोषात गेल्यासारखे गप्प बसून आहेत. कोणी फार तीव्रतेने मुद्दे मांडायला तयार नाही, सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकायला तयार नाही, कारण प्रत्येकाला आपल्या विरोधात चौकशीचे शुक्लकाष्ठ लागेल की काय, याची भीती आहे, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अनुकूल आहेत. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापीठावर शरद पवार पुण्यात दोन वेळा एकत्र आल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार रणनीती आखलेली असताना, दुसरीकडे आपापले गड कसे सांभाळायचे याच्या पलीकडे राज्याचा एकत्रित विचार कोणाकडेही नाही, अशी खदखद दोन्ही काँग्रेसमध्ये आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. प्रत्येकाला जिल्हे वाटप करून दिले आहेत, कामांचे वाटप सुरू आहे.