अतुल कुलकर्णी, मुंबईगेल्या चार वर्षापासून सुरु असलेली अकरावीची आॅनलाईन प्रवेश पध्दती भाजपा शिवसेनेच्या आपापसातील वादामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दहावीचे निकाल जवळ आलेले असताना शिक्षणमंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांची बैठकही अद्याप झालेली नाही.अकरावीची आॅनलाईन प्रवेश पध्दत बंद करावी, अशी मागणी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना भेटून केली आहे. आदित्य यांचे नेमके कोणते आक्षेप आहेत असे तावडे यांना विचारले असता ते म्हणाले, विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश मिळत नाही, २५ प्राधान्यक्रम लिहावे लागतात, कॉलेजचे कटआॅफ परसेंटेज कळत नाही असे काही आक्षेप आहेत. मात्र वेबसाईटवर त्या त्या कॉलेजची गेल्यावर्षीची कटआॅफ लिस्ट देण्याची व्यवस्था करता येईल. आॅनलाईन पध्दत योग्य आहे, असा दावा तावडे यांनी केला.
भाजपा-सेना आमनेसामने!
By admin | Updated: May 16, 2015 00:28 IST