शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बिट मार्शलच्या सतर्कतेने टळला प्रसंग

By admin | Updated: July 20, 2015 01:47 IST

चार वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घणसोली येथे घडली. मात्र दक्ष नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे बिट मार्शल

नवी मुंबई : चार वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घणसोली येथे घडली. मात्र दक्ष नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे बिट मार्शल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मुलीची सुखरूप सुटका केली. अपहरणकर्त्याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घणसोली येथील पामबीच मार्गावर रात्री ११ वाजता प्रकार घडला. निर्जनस्थळी स्कूटी उभी करून लहान मुलीसह तरुण झाडीमध्ये गेल्याची माहिती एका दक्ष नागरिकाने पोलिसांना दिली. त्यानुसार कोपरखैरणे पोलिसांच्या घणसोली चौकीतील बिट मार्शल बळीराम चव्हाण व दीपक गाडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पामबीच मार्गावर निर्जनस्थळी उभी केलेली स्कूटी दिसली. मात्र तिथे कोणीच नसल्याने त्यांनी झाडीमध्ये पाहिले असता लहान मुलगी व तरुण आढळला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता झाडीत घुसून राहुल पाटेकर (२०) याला ताब्यात घेतले. तो घणसोली सेक्टर ३ येथील ग्रीन पार्क सोसायटीत राहणारा विद्यार्थी आहे. पोलिसांच्या चौकशीत मुलीसोबत नाते असल्याचे व नैसर्गिक विधीसाठी तिला झाडीत नेल्याचे सांगितले. परंतु मुलीने राहुलला ओळखण्यास नकार दिला. अखेर पोलिसांन चौकशी करत मुलीचे घर गाठले असता तिच्या आई-वडिलांनीही राहुलला ओळखले नाही. घरच्यांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.घणसोली घरोंदा येथे राहणारी ही चार वर्षांची मुलगी रात्री १०.३०च्या सुमारास नेहमीप्रमाणे इमारतीखाली खेळत होती. या वेळी स्कूटीवरून आलेल्या राहुल पाटेकर (२०) याने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला जवळ बोलवले. त्यानंतर तिचे तोंड दाबून स्कूटीवरून पामबीच मार्गावर निर्जन स्थळी नेले. तो तिला रस्त्यालगतच्या झाडीमध्ये नेत असताना एका मोटारसायकलस्वाराला त्याच्यावर संशय आल्याने त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांना काही मिनिटांचा विलंब झाला असता तर ही चिमुरडी राहुलच्या वासनेची बळी ठरली असती. घटनास्थळ रबाळे पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्याला रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप जगदाळे यांनी सांगितले. वैद्यकीय चाचणीत मुलीसोबत गैरकृत्य झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच नगरसेवक घनश्याम मढवी, सुरेश सकपाळ, संदीप गलुगडे, आत्माराम सणस, राजू गावडे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.