शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी...

By admin | Updated: November 27, 2015 01:11 IST

गुजरातच्या लेखकांचा सूर : सहिष्णुता वाढीसाठी प्रयत्न, पुरस्कार वापसीतून भावना व्यक्त

कोल्हापूर : गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी आहे. सन २००२ नंतर तेथे विविध मार्गाने विचार दडपण्याचे प्रकार वाढत आहेत. अलीकडे पोषक वातावरण असल्यामुळे देशभर असहिष्णुतेची धार वाढते आहे, असा सूर गुजरातमधील लेखक, साहित्यिक यांच्यातून गुरुवारी येथील पत्रकार परिषदेत निघाला. पुरस्कार वापसी करून विचारवंत आपल्या भावना व्यक्त करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. सहिष्णुता आणि असहिष्णुता यासंबंधी देशभरात निर्माण झालेल्या प्रश्नांसंबंधी लोकभावना समजून घेण्यासाठी ‘दाक्षिणायन’ मोहिमेंतर्गत गुजरातमधील लेखकांचा जत्था येथे आला आहे. येथील गायन समाज देवल क्लबमध्ये अच्युतराव भांडारकर कलादालनात पत्रकार परिषदेत या साहित्यिकांनी आपले विचार मांडले. चित्रपट निर्माते परेश नायक (गुजरात) म्हणाले, गुजरातमध्ये जन्मलेल्या असहिष्णुतेने २००२ ते २०१५ पर्यंत टोक गाठले आहे. विचार स्वातंत्र्यावरच घाला घातला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर देशभर असहिष्णुतेची लाट पसरली आहे. सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी, विचारवंत असहिष्णुतेला विरोध करीत पुरोगामी विचार जनतेपर्यंत पोहोचवित आहेत.डॉ. गणेश देवी (गुजरात) म्हणाले, असहिष्णुतेसंबंधी निर्माण झालेल्या लोकभावना समजून घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांत गुजरातमधील आम्ही साहित्यिक दौरा करीत आहोत. गुजरात असहिष्णुतेची कार्यशाळा आहे. वेगळा विचार मांडणाऱ्या विचारवंतांची हत्या करणे चिंताजनक आहे. देशभरात असहिष्णुतेचे ढग गडद होत चालले आहेत. त्यामुळे साहित्यिक, विचारवंत, चित्रपट निर्माते, कष्ट आणि मूल्यांचा सन्मान म्हणून स्वीकारलेला पुरस्कार शासनाकडे परत करीत आहेत. पुरस्कार वापसीनंतर आता ज्याप्रमाणे आमिर खानवर आरोप, टीका होत आहे, त्याप्रमाणे साहित्यिकांवरही होत आहेत. मात्र, देश कोणा एका नेत्याचा किंवा पक्षाचा नाही. यावेळी अनिल जोशी (गुजरात), प्रवीण बांदेकर, गणेश विस्पुते (सावंतवाडी), प्राचार्य राजेंद्र कुंभार, संजीव खांडेकर (मुंंबई) यांनी विचार मांडले. यावेळी मेघा पानसरे, राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव, उदय नारकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, गुजरातहून आलेले साहित्यिक डॉ. गणेश देवी, मनीष जानी, उत्तम परमार, कानजी पटेल, अनिल जोशी, परेश नायक यांनी सकाळी अ‍ॅड. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बिंदू चौकातील अ‍ॅड. पानसरे यांच्या कार्यालयास भेट दिली. (प्रतिनिधी)आरएसएस, भाजपचे असहिष्णुतेला प्रोत्साहनगुजरात नवनिर्माण आंदोलनाचे संस्थापक मनीष जानी म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून गुजरातमध्ये असहिष्णुता आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. त्यांच्या विरोधात बाहेर पडलेल्या बळिराजांचा आवाज दडपला जात आहे. असहिष्णुतेला आरएसएस आणि भाजप प्रोत्साहन देत आहेत. पानसरे यांच्या हत्येनंतर तीन दिवस बंद करणाऱ्या कोल्हापूरकरांना सलाम आहे. दबाव अन् दबावच...शासनाचा पुरस्कार तुम्ही परत केल्यानंतर शासन व अन्य घटकांकडून दबाव येत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना देवी म्हणाले, दबाव नसलेला एक मिनीटही नाही. जो भीतो तो क्षणाक्षणाला मरत असतो. ज्याला भीती नाही, तो मरत नाही. अशाप्रकारे दबावाला बळी न पडता आमचे काम सुरू आहे.