शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

भारत-इस्त्राइल शैक्षणिक भागीदारीमुळे नवीन थिंक टँकचा जन्म

By admin | Updated: March 31, 2017 18:35 IST

मुंबई विद्यापीठामध्ये गेट वे हाऊसच्या वतीने भारत आणि इस्त्रायली शिक्षणप्रेमींसाठी एकदिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 - मुंबई विद्यापीठामध्ये गेट वे हाऊसच्या वतीने भारत आणि इस्त्रायली शिक्षणप्रेमींसाठी एकदिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये भारत आणि इस्त्रायलमधील मीडिया, जनसंपर्क यांची भागीदारी आणि शिक्षणसंस्थांचे महत्त्व याबाबत विचार करण्यात आला. या चर्चासत्राचे फलित म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये भारत-इस्त्राईल अभ्यासकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. हे नवीन अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ आणि इस्त्राईलमधील तेल अवीव विद्यापीठाशी जोडण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी जून-जुलै महिन्यात इस्त्राईलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या अभ्यासकेंद्राला महत्त्व आले‌ आहे.गेट वे हाऊसचे कार्यकारी संचालक मनजित कृपलानी यावेळी म्हणाल्या, शिक्षणक्षेत्रामध्ये आता थिंक टँकची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. केवळ शिक्षणक्षेत्राशी जोडल्या गेलेल्या थिंक टँकची मक्तेदारी आता संपुष्टात येईल. शिक्षणक्षेत्रामधून बाहेर येणारे स्कॉलर्स आता देश तसेच विदेशांमधील विविध शासकीय यंत्रणांच्या नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतील.

व्यवसाय हा नियोजनाची अंमलबजावणी करीत असल्यामुळे व्यवसायाने नियोजन प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, असेही मत कृपलानी यांनी यावेळी व्यक्त केले. इस्त्राइल आणि अमेरिकेमध्ये नियोजन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने राबविली गेली आहे. व्यावसायिक आणि थिंक टँकच्या समन्वयामुळे हे दोन्ही देश यशस्वी ठरले आहेत. यासारखेच यश मुंबईतील व्यावसायिकांनाही मिळू शकते. सरतेशेवटी हा व्यवसाय असून तो नियोजनाची अंमलबजावणी करतो. त्यामुळे व्यावसायिकांची नियोजनाबाबत मदत घेणे हे सर्वांसाठीच यशदायक आहे, असेही कृपलानी म्हणाल्या.तंत्रज्ञान, शहरी शिक्षण, पर्यावरण याबाबत इस्त्राईल भारताला खूप काही मदत करू शकतो. एखादी छोटीशी कल्पना तंत्रज्ञानाच्या आधारे यशस्वी करून ती राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर नेण्याची क्षमता भारतामध्ये आहे, असेही कृपलानी म्हणाल्या. आपल्या समारोपपर भाषणामध्ये कृपलानी यांनी मुंबई विद्यापीठ आणि तेल अवीव विद्यापीठाच्या भागीदारीमुळे मुंबई आणि गेट वे हाऊसमध्ये नवीन टॅलेंट निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.