शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

पंछी, नदिया, पवन के झोकें, कोई सरहद ना इन्हे रोके

By admin | Updated: November 5, 2016 08:12 IST

असं म्हणतात की, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. याचाच प्रत्यय एका प्रेमी युगुलाच्या निमित्ताने आला आहे.

मुंबई : असं म्हणतात की, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. याचाच प्रत्यय एका प्रेमी युगुलाच्या निमित्ताने आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधून सध्या विस्तव जात नाही, हे वास्तव असले तरी प्रेमाच्या चिरंतन सत्याने या परिस्थितीवरही मात केली आहे. मुंबईचे मोइज आमीर (३०) आणि कराचीतील फातेमा गाडीवाला यांचा साखरपुडा नुकताच झाला. या प्रेमाने ‘सरहद’ ओलांडून मानवी नात्याला नवे परिमाण दिले आहे.

मुंबईतील मोइज आणि कराचीत जन्मलेल्या फातेमा यांचा परिचय याच वर्षी जानेवारीत एका नातेवाइकाच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर हे दोघेही प्रेमात पडले. याबाबत आमीर म्हणतात की, भारताच्या विभाजनानंतर आमचे नातेवाईक कराचीत स्थायिक झाले. दरम्यान, आमच्या कुटुंबाकडून मुलगी पाहणे सुरू होते. आम्हाला असे कळले की, फातेमाचे कुटुंबीयही तिच्यासाठी मुलाच्या शोधात आहेत. दोन्ही कुटुंबांनी आमच्या विवाहासाठी होकार दिल्यानंतर आम्ही दोघे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होतो. 

आणखी वाचा

मध्य रेल्वेवर धावणार १0 बम्बार्डियर लोकल?

वाहक-चालकांची ‘कॅनेडियन’ वेळापत्रकातून सुटका नाही

शिवस्मारक जागेवरून मच्छीमार आक्रमक

 फातेमा यांचा व्हिसा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू फातेमा यांचा व्हिसा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. शहरात एका वेब पोर्टलमध्ये काम करणाऱ्या आमीर यांनी सांगितले की, ‘सगाई’साठी फातेमा, तिची आई, भाऊ, काका यांना भारतात येण्यासाठी पाकिस्तानातील भारतीय दूतावासाने खूप सहकार्य केले. या आठवड्याच्या सुरुवातीलाच फातेमा आपल्या नातेवाइकांसह भारतात आली. दक्षिण मुंबईमध्ये गुरुवारी धूमधडाक्यात त्यांची ‘सगाई’ झाली. यावेळी दोन्ही कुटुंंबातील सदस्य उपस्थित होते. पुढील वर्षी सुरुवातीलाच ‘निकाह’ आणि रिसेप्शन समारंभासाठी आमीर कराचीत जाणार आहेत. आईसह स्वत:चा व्हिसा काढण्यासाठी ते आता दिल्लीस्थित पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क करणार आहेत.

आमीर म्हणाले की, दोन्ही देशातील सरकारला आम्ही या विवाहाच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की, जर आम्ही चर्चेसाठी प्रेमाची भाषा वापरली, तर राहण्यासाठी जगातील ही सर्वात चांगली जागा होऊ शकते. भारतात येण्यासाठी आपण अतिशय उत्सुक असल्याचे फातेमाने सांगितले.