शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांच्या चारा, पाण्यासाठी खुला केला ज्वारीचा मळा!

By admin | Updated: January 14, 2016 02:20 IST

राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना पक्ष्यांनाही त्याची झळ बसत आहे. त्यांना अन्न-पाण्यासाठी भटकावे लागत असल्याची दखल घेत एका शेतकऱ्याने थेट त्याचे साडेतीन

- बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा (अहमदनगर)राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना पक्ष्यांनाही त्याची झळ बसत आहे. त्यांना अन्न-पाण्यासाठी भटकावे लागत असल्याची दखल घेत एका शेतकऱ्याने थेट त्याचे साडेतीन एकर ज्वारीचे शेत पक्ष्यांसाठी खुले केले आहे. एवढेच नव्हे तर त्याने पक्ष्यांसाठी चार पाणवठेही बांधले आहेत. वांगदरी येथील शेतकरी प्रल्हाद निवृत्ती नागवडे यांच्या साडेतीन एकर शेतातील ज्वारीच्या टपोऱ्या कणसावर ऐटीत बसून विविध प्रकारचे पक्षी ताव मारताना दिसत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गाव घोड धरणाच्या लाभ क्षेत्रातील ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी ज्वारी, गव्हाच्या पिकांकडे मोर्चा वळविला आहे. प्रल्हाद नागवडे यांनी नऊ एकर शेतीपैकी साडेतीन एकर क्षेत्रात ज्वारीची पेरणी केली, पिकास खतपाणी घातले. त्यामुळे जोंधळ्याला चांदणे लगडले. दुष्काळीस्थितीमुळे जिरायत भागातील विविध प्रकारचे पक्षी तहानभूक भागविण्यासाठी घोडच्या पट्टयात आले आहेत. प्रल्हाद नागवडे व त्यांचा मुलगा अविनाश यांनी पैशांचा विचार न करता ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीव्हीसी पाईप कापून त्याचे पाणवठे तयार केले. विविध प्रकारचे पक्षी नागवडे यांच्या मळ्यात हक्काने येऊन भूक, तहान भागवित आहेत. अध्यात्मिक वारसा असलेले नागवडे कुटुंब तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे.ईश्वराच्या सेवेपेक्षा पशुपक्ष्यांच्या सेवेतून अधिक समाधान मिळते. यात मोठा आनंद आहे. ‘पक्षी येती शेतात, आम्हा तोचि दिवाळी दसरा’. कायम दिवाळी, दसरा साजरा होण्यासाठी दरवर्षी ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करणार आहे.- प्रल्हाद नागवडे, प्रगतशील शेतकरी, वांगदरीदुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे मार्च, मे महिन्यात पशुपक्ष्यांचे जीवनमान धोक्यात येणार आहे. आणीबाणीच्या काळात प्रत्येकाने मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले पाहिजेत. माणसांच्या जेवणावळी उठविण्यापेक्षा प्रल्हाद नागवडे यांचा आदर्श घेऊन उन्हाळ््याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी पशुपक्ष्यांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था करावी. सुटीचा आगळावेगळा आनंद लुटावा. - ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय