शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅस प्रकल्पालाही सुरू झाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 04:03 IST

बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला सत्ताधाऱ्यांनीच खो घालण्याचा प्रकार सुरू आहे.

कल्याण : एकीकडे घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणी अभावी शहरातील कचऱ्याचे तीनतेरा वाजले असताना दुसरीकडे यावर उपाययोजना म्हणून बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला सत्ताधाऱ्यांनीच खो घालण्याचा प्रकार सुरू आहे. उंबर्डे येथे कचरा डम्पिंग करण्यास शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांचा विरोध कायम असताना आता भाजपाचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनीही त्यांच्या प्रभागात बायोगॅस प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंड प्रमाणे आता बायोगॅस प्रकल्पालाही विरोध करण्याचे प्रकार सत्ताधाऱ्यांकडूनच सुरू झाल्याने घनकचरा व्यवस्थापन करायचे तरी कसे? असा यक्षप्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने केडीएमसी क्षेत्रात नवीन बांधकामांना बंदी घातली होती. यावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात ठोस उपाययोजना केल्या जात असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर बांधकाम बंदी उठविण्यात आली. परंतु आजवर ठोस अशी कृती घनकचरा व्यवस्थापनाबाबत झालेली नाही. दरम्यान, महापालिका क्षेत्रात १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर प्रभागात बायोगॅस प्रकल्प उभारण्यास नगरसेवक म्हात्रे यांनी विरोध दर्शविला आहे. १० मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने सादर केला होता. यावेळी म्हात्रे यांनी आपला या प्रस्तावाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. याठिकाणी उद्यानाचे आरक्षण आहे. त्यात बदल करण्यात आला आहे का? असा सवाल उपस्थित करताना म्हात्रे यांनी संबंधित प्रभागांमध्ये मोठी निवासी संकुले आहेत. प्रस्तावित प्रकल्पामुळे त्यात राहणाऱ्या नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो. तसेच ज्याठिकाणी प्रकल्प राबविला जाणार आहे ती जागा देखील महापालिकेच्या नावावर नाही याकडे लक्ष वेधले. यासंदर्भात त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला पत्र देऊन संपूर्ण प्रकल्पाची माहिती मागविली होती त्याचीही विचारणा बैठकीत म्हात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. बायोगॅस प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही याला महासभेची मान्यता घेण्यात आली आहे. दरम्यान म्हात्रे यांचे पत्र मिळाले असून प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली जाईल आणि तांत्रिक अहवाल स्थायीला सादर केला जाईल असे स्पष्टीकरण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी दिले. यावर प्रस्तावित प्रकल्पाची संपूर्णत: माहिती पुढील सभेत सादर करण्याचे आदेश देताना संबंधित प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येत असल्याचे सभापती संदीप गायकर यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी) >डोंबिवली पूर्वेतील प्रकल्पास मान्यताडोंबिवली पूर्वेकडील आयरेरोड भागात बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या अन्य एका प्रस्तावाला मात्र स्थायी समितीकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला.